DRDO भरती 2022 सकाळ डिजिटल टीम
एज्युकेशन जॉब्स

DRDO भरती 2022: DRDO मध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; या लिंकवरून अर्ज करा

डीआरडीओमध्ये होत आहे 600 पेक्षा अधिक जागांकरता भरती. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने सायंटिस्ट ब वर्गातील पदांसाठी (DRDO भरती 2022) अर्ज आमंत्रित केले आहेत.

ही भरती विज्ञान शाखेतील पदवीधर अभियंता आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी आहे. या भरतीद्वारे, DRDO, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) मधील एकूण 630 पदे भरली जातील. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

DRDO भरती 2022 करीता एकुण 630 रिक्त जागा आहे. त्यामध्ये ब गटातील शास्त्रज्ञांसाठी 579 पदे आहेत, DST - 8 पदे आहेत, ADA- 43 पदे आहेत. 29 जुलै ही अर्ज करायची आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख आहे.

माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://rac.gov.in/download/advt_140_v3.pdf

DRDO भर्ती 2022 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?

  • ब गटातील शास्त्रज्ञांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची डिग्री असणे आवश्यक आहे.

  • डीएसटीसाठी अर्ज करणाऱ्यांनी बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे.

  • ADA भरतीसाठी, उमेदवारांकडे रासायनिक अभियांत्रिकी, पॉलिमर अभियांत्रिकी किंवा पॉलिमर सायन्समध्ये बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक

डीआरडीओ भरती २०२२ साठी येथे अर्ज करा

https://rac.gov.in/drdo/public/login

वयची काय मर्यादा आहे?

  • ब गटातील शास्त्रज्ञांसाठी या पदाकरता अर्ज भरण्यासाठी 28 वर्षाची मर्यादा आहे.

  • DST या पदाचा अर्ज भरण्यासाठी 35 वर्षाची मर्यादा आहे.

  • ADA या पदाचा अर्ज भरण्यासाठी 30 वर्षाची मर्यादा आहे.

अर्ज भरतांना फी किती लागेल?

सामान्य श्रेणी, EWS आणि OBC च्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तसेच एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT