DRDO  google
एज्युकेशन जॉब्स

DRDO मध्ये काम करायचं आहे ? ITI वाल्यांना सुद्धा संधी, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

राज्य/भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ६०% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये उमेदवार १ली श्रेणी ITI पास असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : संरक्षण संशोधन विकास संस्थेने (DRDO) भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार, या मोहिमेत एकूण १०० पदांची भरती केली जाईल.

यासाठी उमेदवार संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेची भरती प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे.

या मोहिमेद्वारे DRDO मध्ये एकूण १०० पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पदवीधर अभियंता अप्रेंटिसच्या ५० पदे, डिप्लोमा अप्रेंटिसच्या २५ पदे आणि आयटीआय शिकाऊ उमेदवाराच्या २५ पदांचा समावेश आहे. भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर, डिप्लोमा आणि आयटीआय पास असावेत.

पदनिहाय शैक्षणिक पात्रता

पदवीधर अभियंता शिकाऊ : या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान 6.3 CGPA सह मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा अप्रेंटिस : या पदासाठी, उमेदवाराने राज्य तंत्रशिक्षण मंडळ/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयात ६०% गुणांसह अभियांत्रिकीमधील पहिली श्रेणी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.

ITI शिकाऊ उमेदवार : राज्य/भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून ६०% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये उमेदवार १ली श्रेणी ITI पास असणे आवश्यक आहे.

स्टायपेंड किती असेल

पदवीधर अभियंता अप्रेंटिस : १२ हजार रुपये प्रति महिना

डिप्लोमा अप्रेंटिस : ११ हजार रुपये प्रति महिना

आयटीआय शिकाऊ : १० हजार रुपये प्रति महिना

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : २० मे २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० मे २०२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट जड वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT