High Salary Jobs 
एज्युकेशन जॉब्स

High Salary Jobs: मुलांना या काही गोष्टी शिकवल्यात तर त्यांना भविष्यात मिळेल भरगोस पगाराची नोकरी

Best High Salary Courses: टिकून राहायचे असेल तर आधुनिक काळाची गरज ओळखून त्यानुसार मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे.

नमिता धुरी

High Salary Jobs : प्रत्येक पालकाला वाटत असते की आपल्या मुलांना भविष्यात लाखो रुपये पगाराची नोकरी मिळावी; जेणेकरून त्यांना आपले आयुष्य निवांत जगता येईल. तुमची ही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुमच्या मुलांना काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे.

भविष्यात माणसाची जागा रोबोट घेतील असे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत टिकून राहायचे असेल तर आधुनिक काळाची गरज ओळखून त्यानुसार मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे.

कोडींग

व्हिज्युअल ब्लॉक प्रोग्रामिंग भाषांद्वारे मुलांना वयाच्या चौथ्या वर्षापासून कोडींग शिकवले जाऊ शकते. ७ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील मुले टेक्स्ट आधारित कोडींग शिकू शकतात.

एका आकडेवारीनुसार २०२४ सालापर्यंत सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग नोकऱ्यांमध्ये १८.८ टक्के आणि कम्प्युटर सिस्टीम विश्लेषकांच्या नोकऱ्यांमध्ये २०.९ टक्के वाढ होईल.

गणित-विज्ञान

आजकाल जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये गणित-विज्ञानाचे ज्ञान आवश्यक असते. गणित तर्कबुद्धी, क्रिटीकल थिंकींग, समस्या निराकारण इत्यादी गोष्टी शिकवते. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात काम करताना गणित आणि विज्ञान उपयुक्त ठरते.

विदा विश्लेषण (data analytics)

भविष्यात विदा विश्लेषणाला अधिक महत्त्व येणार आहे. या क्षेत्रातील कुशल कर्मचाऱ्यांची संख्या ७ वर्षांत ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

लिबरल आर्ट्स अॅण्ड ह्युमॅनिटीज

भविष्यात भरगोस पगार मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांमध्ये क्रीटीकल थिंकींग, लेखनकौशल्य, अध्ययनकौशल्य, सर्जनशीलता आणि संवादकौशल्य, इत्यादी गुणांना बराच वावा निर्माण होणार आहे. या सर्व गोष्टी लिबरल आर्ट्स अॅण्ड ह्युमॅनिटीज क्षेत्राशी संबंधित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT