student Sakal
एज्युकेशन जॉब्स

Sakal Vidya: अभियंता, शास्त्र, फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

सकाळ विद्या आणि विद्यालंकार इन्टिट्यूटतर्फे संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शास्त्र शाखेबरोबरच अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. ‘सकाळ विद्या’ आणि ‘विद्यालंकार इन्टिट्यूट’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

शास्त्र शाखा, अभियांत्रिकी शाखा, फार्मसी शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेबाबत अनेक शंका असतात. पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना नसते. ही माहिती या शिबिराच्या माध्यमातून दिली जाणार आहे. या शिबिरात प्राध्यापक हितेश मोघे, प्रा. प्रकाश जकातदार मार्गदर्शन करणार आहेत.

प्रा. मोघे यांचे आय.आय.टी. (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण झाले असून ते पंधरा वर्षांपासून गणित विषयाचे अध्यापन करत आहेत. ‘विद्यालंकार इन्टिट्यूट’च्या गणित विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत. या शिबिरात ते अभियांत्रिकी, शास्त्र आणि फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा असतात, त्यात यशस्वी होण्यासाठी तयारी कशी करायची याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

प्रा. जकातदार हे पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश परीक्षेची पाल्य तयारी करत असताना त्यासाठी पालकांची भूमिका काय असावी यावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. या शिबिरात ‘विद्यालंकार इन्टिट्यूट’मधील टॉपर असलेले प्रणव कुटे आणि राया चक्रवर्ती यांचे अनुभव कथन होणार आहे.

शिबिराचे उद्दिष्टे :

  • - अभियांत्रिकी, शास्त्र शाखा आणि फार्मसी क्षेत्रात कोणत्या संधी आहेत, याचे मार्गदर्शन

  • - या क्षेत्रात प्रवेश परीक्षांची तयारी कशी करायची?

  • - योग्य करिअरसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाचा शोध

  • - बारावीसाठी कोणते बोर्ड निवडणार?

  • - पाल्य प्रवेश परीक्षांची तयारी करत असताना पालकांची भूमिका कशी असावी याचे मार्गदर्शन

कधी आहे शिबिर?

तारीख - रविवार ता. २ एप्रिल

वेळ - सकाळी अकरा वाजता

कोठे? - मॉडर्न महाविद्यालय ऑडिटोरियम

कोण होऊ शकते सहभागी?

- दहावी आणि त्यापुढील पाल्य आणि त्यांचे पालक

नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

SCROLL FOR NEXT