jee  sakal
एज्युकेशन जॉब्स

Educational News : युजीसी नेट, जेईई आणि नीटच्या तारखा जाहीर

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) यासंबंधीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सहायक प्राध्यापकाबरोबरच संशोधन शिष्यवृत्तीसाठीची राष्ट्रीय पात्रता परिक्षा अर्थात युजीसी-नेट, तसेच देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी आवश्यक आयआयआयटी जेईई आणि वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेच्या तारखा घोषीत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) यासंबंधीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

देशात यावर्षी युजीसी नेट जुन २०२३ ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात आली. ही परीक्षा १३ ते १३ जून आणि १९ ते २२ जून दरम्यान परीक्षा झाली. त्यानंतर आता एनटीएकडून डिसेंबर महिन्यातील परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ६ ते १२ डिसेंबरला युजीसी नेट परीक्षा पार पडणार आहे.

त्याआधी पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकही एनटीएकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील वर्षी ही परीक्षा १० ते २१ जून या दरम्यान होणार आहे. दरम्यान, ‘एनटीए’कडून दरवर्षी काही महिने आधीच प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते.

या सर्व परीक्षा एनटीएकडून देशभरात घेतल्या जातात. देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई परीक्षेला खूप महत्व आहे. या परीक्षा संगणक आधारीत असतात. वेळापत्रकानुसार जेईई परीक्षेचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी तर दुसरा १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

नीट परीक्षा पाच मे रोजी नियोजित आहे. देशातील केंद्रीय विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयुईटी युजी) १५ ते ३१ मे दरम्यान होईल. तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची (सीयुईटी पीजी) परीक्षा ११ ते २८ मार्च या कालावधी घेण्यात येणार आहे.

परीक्षांविषयीची सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना प्रसिध्द केली जाईल. संगणक आधारीत सर्व परीक्षांचे निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील तीन आठवड्यांमध्ये जाहीर केले जाणार आहेत. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

अधिक माहितीसाठी - https://nta.ac.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT