Exam Result Anxiety esakal
एज्युकेशन जॉब्स

Exam Result Anxiety : मुलांना परीक्षेच्या निकालाची चिंता सतावतेय? मग, जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय

Exam Result Anxiety : आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धात्मक परिस्थितीत परीक्षा हा शब्द विदयार्थ्यांच्या मनात ताण-तणाव आणि चिंता निर्माण करतो.

Monika Lonkar –Kumbhar

Exam Result Anxiety : सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धात्मक परिस्थितीत परीक्षा हा शब्द विदयार्थ्यांच्या मनात ताण-तणाव आणि चिंता निर्माण करतो. बरं हे केवळ महाविद्यालयीन किंवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही. शाळेतील मुलांना सुद्धा निकालाच्या दिवशी भीती वाटते.

२०२२ च्या NCERT च्या एका सर्वेक्षणानुसार अंदाजे ८०% टक्के विद्यार्थी परीक्षा आणि निकालाच्या चिंतेमुळे ग्रस्त आहेत. परीक्षेचा ताण ही सामान्य समस्या असली तरी याचा परिणाम सर्व शैक्षणिक प्रणालींमधील विद्यार्थ्यांवर होतो. या परिणामाची तीव्रता वेगवेगळी दिसू शकते.

जसे की, काही विद्यार्थ्यांसाठी मध्यम ताण हा प्रेरणादायी असू शकतो, तर काहींसाठी हा ताण नकारात्मक असू शकतो. आज महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, या निकालाची चिंता काही विद्यार्थ्यांच्या मनात असू शकते. या परीक्षा निकालांच्या चिंतेचे परिणाम एकूण मानसिक आरोग्यावर होतात. यापासून सुटका कशी करावी?  आणि या स्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी? त्या संदर्भात तज्ज्ञ काय सांगतात? ते आपण जाणून घेणार आहोत.

मोकळा संवाद महत्वाचा

निकालाच्या चिंतेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्था आणि चिंता निर्माण होते. त्यामुळे, त्यांच्या वर्तनात बदल होऊ शकतो. त्यामुळे, अशा स्थितीमध्ये पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी, पालक आणि शिक्षकांनी निकालाच्या परिणामांची काळजी न करता शांत आणि सकारात्मक राहणे आवश्यक आहे.

पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांनी मोकळा संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच, परीक्षेच्या निकालाचा तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी केवळ निकालावरच नाही तर त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यासाठीचे प्रयत्न यावरही लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.

तुलना करू नका

अनेक पालकांना आपल्या मुलांच्या गुणांची तुलना ही इतर विद्यार्थ्यांसोबत करायची सवय असते. ही सवय सर्वात आधी सोडा. कारण, यामुळे तुमच्या मुलावर किंवा मुलीवर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे, गुणांची तुलना अजिबात करू नका.

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही टॅलेंट असते, तशीच कमतरता देखील असते. त्यामुळे, पालकांनी मुलांच्या या गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे तुलना करू नये.

नकारात्मक विचारांची करा सुट्टी

परीक्षेच्या निकालाच्या दिवशी किंवा पूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात निकालाबाबत नकारात्मक विचार येऊ शकतात. हे विचार दूर करण्यासाठी पालक आणि शिक्षक मुलांची मदत करू शकतात. जसे की, भविष्याबाबत अनावश्यक तर्क-वितर्क न करणे, निकालाबाबत कोणतेही अनुमान न लावणे. या स्थितीमध्ये पालक आणि शिक्षक मुलांना पाठिंबा देऊ शकतात आणि भविष्याबाबत सकारात्मक राहण्याचा सल्ला देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा पेच; परवान्याअभावी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे सावट

SCROLL FOR NEXT