Government job
Government job google
एज्युकेशन जॉब्स

Government job : या विद्यापीठात प्राध्यापक पदावर भरती; पगार २ लाखांहून अधिक

नमिता धुरी

मुंबई : आंतर-विद्यापीठ शिक्षक शिक्षण केंद्र (IUCTE), बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) ने प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार iucte.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांच्या 18 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. (BHU Vacancy 2022)

शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यांना किमान 10 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तुम्हाला असोसिएट प्रोफेसरच्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्याकडे अध्यापनाचा आठ वर्षांचा अनुभव असलेली एचडी पदवी असावी.

सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय UGC NET किंवा SLET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पगार

या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 2,17,100 रुपये वेतन दिले जाईल.

प्राध्यापक - रु 1,44,200- रु 2,18,200

सहाय्यक प्राध्यापक – रु 57,700-1,82,400

सहयोगी प्राध्यापक - रु 1,31,400- रु 2,17,100

अर्ज फी

अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT