RBI Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

RBI मध्ये नोकरीची संधी! पदवीधारकांसाठी 303 जागांवर भरती सुरू

सकाळ डिजिटल टीम

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे.

RBI Recruitment 2022 : बँकिंग सेवा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. RBI ने विविध विभागांमध्ये (Reserve Bank of India) ग्रेड बी ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध केलीय. याअंतर्गत एकूण 303 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांची 294 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 9 पदांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या तारखा : RBI ने जारी केलेल्या संयुक्त जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सोमवार, 28 मार्चपासून म्हणजेच पुढील आठवड्यात सुरू होईल. उमेदवारांना 18 एप्रिल 2022 च्या संध्याकाळी सहावाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर, ग्रेड बी अधिकारी (सामान्य) पदांसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा 28 मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्याची ऑनलाईन परीक्षा 25 जून 2022 रोजी होणार आहे. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 2 जुलै रोजी आणि दुसरा टप्पा 6 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. तर, दुसरीकडं सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा 21 मे 2022 रोजी होणार असल्याचं RBI ने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक पात्रता : आरबीआय ग्रेड बी भरती 2022 च्या जाहिरातीमध्ये पात्रतेची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असून किमान 60 टक्के गुण असावेत. किमान 55 टक्के गुणांसह पीजी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. तर दुसरीकडं बँकेनं विहित केलेल्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावं, असं नमूद केलंय. दरम्यान, RBI च्या अधिकृत वेबसाइटला chance.rbi.org.in भेट देऊन अधिक माहिती तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT