career after 12th science esakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Result 2025 : डॉक्टर इंजिनियर सोडून 12th Science नंतर काय करावे ? पहा एकापेक्षा एक भारी कोर्स

Top Career Choices After 12th Science: सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे.

सकाळ डिजिटल टीम

HSC Result 2025 :

बारावी सायन्स नंतर काय करीअर निवडावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मग त्यावेळी इंजिनियरींग, मेडिकल किंवा बी. एस. सी. शिवाय कोणतेच पर्याय दिसत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला या व्यतिरीक्त असे पर्याय सांगणार आहोत, जे ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल.

सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्याय आ़़ज आपण जाणून घेणार आहोत.

नॅनोटेक्नोलॉजी-

बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय आहे. नॅनोटेक्नोलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक झाल्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता.

रोबोटिक सायन्स-

रोबोटिक सायन्स खुप मोठे क्षेत्र आहे. या या क्षेत्रात अनेक स्पेशलायझेशन कोर्स छान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सिस्टम, कॉम्प्युटर सायन्स मधून पदवी घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रम करु शकतात. यानंतर विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या नामांकित संस्थेत संशोधन कार्यात नोकरी मिळू शकते.

एन्व्हायर्नमेंटल सायन्स -

पर्यावरणप्रेमी या क्षेत्रात उत्तम करीअर घडवू शकतात. या अंतर्गत इकॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वाईल्डलाईफ मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोल,सारखे विषय शिकवले जातात. यात करीअर म्हणून नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.

स्पेस सायन्स-

हे विज्ञानाचे खूप विस्तृत क्षेत्र आहे. या अंतर्गत कॉस्मॉलॉजी, स्टेलर सायन्स ,प्लॅनेटरी सायन्स ,ऍस्ट्रॉनॉमी अशी अनेक क्षेत्रे आहेत. याचा अभ्यासक्रम केल्यास बंगलोरमध्ये असलेल्या इस्रो आणि आयआयएससी (IISC)मध्ये नोकरीची उत्तम संधी असते.

डेयरीसायन्स-

दुग्ध क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे आहे. दुग्ध उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेयरी टेक्नॉलॉजी किंवा डेयरी सायन्स अंतर्गत आपण यात शिक्षण घेऊ शकतो. विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टुडन्ट ऑल इंडिया आधारावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांच्या पदवीधर डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्र करु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT