ICMAI Canva
एज्युकेशन जॉब्स

ICMAI CMA 2021: परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता 30 मे

ICMAI CMA 2021 : परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता 30 मे

श्रीनिवास दुध्याल

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्‌सने सीएमए परीक्षा 2021 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मेपर्यंत वाढविली आहे.

सोलापूर : इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्‌स (Institute of Cost and Management Accountants of India : ICMAI) ने सीएमए परीक्षा 2021 (CMA Exam 2021) साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मेपर्यंत वाढविली आहे. त्याअंतर्गत फाउंडेशन, इंटरमीजिएट आणि अंतिम अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सीएमए 2021 परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आता संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icmai.in वर नोंदणी करू शकतात. उमेदवार विलंब शुल्काशिवाय 30 मे 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. (ICMAI CMA 2021: The last date for filling up the examination form is now 30th May)

आयसीएमएआय वेबसाइटवरील अधिकृत अधिसूचनेमध्ये असे लिहिले आहे की, "कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्‌भवणारी परिस्थिती लक्षात घेता फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवार विलंब शुल्काशिवाय 30 मे 2021 पर्यंत फॉर्म सबमिट करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या टप्प्यांचे अनुसरण करून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

असा करा ऑनलाईन अर्ज

सीएमए परीक्षा 2021 साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वप्रथम आयसीएमएआयची अधिकृत साइट icmai.in वर भेट द्या. यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या परीक्षा लिंकवर क्‍लिक करा. यानंतर नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा अर्जावर क्‍लिक करावे लागेल. यानंतर तपशील भरा आणि सबमिट करा. पुढील डाउनलोड करण्यासाठी पेज डाउनलोड करा आणि त्याची हार्ड कॉपी ठेवा.

संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फाउंडेशनची परीक्षा 23 जुलै 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंटरमीजिएट आणि अंतिम कोर्स परीक्षा 26 जुलैपासून सुरू होईल आणि 2 ऑगस्ट 2021 रोजी संपेल. याशिवाय परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

IND vs AUS 2nd T20I: मेलबर्नवर ६४८२ दिवसानंतर हरला भारत; लाजीरवाण्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव वाचा काय म्हणतो

IND vs AUS 2nd T20I Live: ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; अभिषेक शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताच्या अन्य फलंदाजांनी खाल्ली माती

Latest Marathi News Live Update : बोईसर एमआयडीसीत पुन्हा आग; रिस्पॉन्सिव्ह कंपनी जळून खाक, कामगारांमध्ये भीती

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

SCROLL FOR NEXT