IDBI Bank
IDBI Bank esakal
एज्युकेशन जॉब्स

IDBI बँकेच्या 'या' परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा Result

सकाळ डिजिटल टीम

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (IDBI) सहाय्यक व्यवस्थापक पदासाठीच्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केलाय.

IDBI Bank AM Result 2021 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (IDBI) सहाय्यक व्यवस्थापक पदासाठीच्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केलाय. दरम्यान, जे उमेदवार या परीक्षेला बसले होते, ते अधिकृत वेबसाइटवर idbibank.in जावून आपला निकाल (IDBI Bank Assistant Manager Result) तपासू शकतात. या रिक्त पदांद्वारे एकूण 650 पदांची भरती केली जाणार आहे.

आयडीबीआयने सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी जारी केलेल्या जागेकरिता अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट रोजी सुरू झाली. यामध्ये (IDBI Bank Assistant Manager Recruitment 2021) उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत वेळ मिळाला. तीच तारीख शुल्क जमा करण्याची शेवटची होती. आता त्याचा निकाल अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आला असून उमेदवार वेबसाइटवर जाऊन तो पाहू शकतात.

असा तपासा 'निकाल'

-निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम IDBI च्या अधिकृत वेबसाइटवर idbibank.in जा.

-वेबसाइटच्या मुख्यपेजवर गेल्यानंतर Recruitment Notification for Admissions to IDBI Bank PGDBF – 2021-22 यावरती क्लिक करा.

-आता Result for Online Examination या लिंकवर क्लिक करा.

-त्यानंतर आपला तपशील भरून लॉगइन करा.

-आपण लॉगइन करताच, निकाल स्क्रीनवर दिसेल.

-तो डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

रिक्त पदाचा तपशील

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, IDBI बँकेत सहाय्यक व्यवस्थापक श्रेणी A च्या 650 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 265 जागा, ओबीसी उमेदवारांसाठी 175 जागा, ईडब्ल्यूएससाठी 65, अनुसूचित जाती प्रवर्गातील 97 आणि एसटीसाठी 48 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी मिळवलेली असावी. शिवाय, पदवीसाठी किमान 60% गुण प्राप्त असावेत. एससी-एसटी आणि अपंगांसाठी पदवीमध्ये 55% गुण अनिवार्य आहे. अर्जदारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असावे. राखीव श्रेणीच्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT