Neet-2020 Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET PG समुपदेशनाला विलंब! IMA ची पंतप्रधानांना हस्तक्षेपाची विनंती

NEET PG समुपदेशनाला विलंब! IMA ने केली पंतप्रधानांना हस्तक्षेपाची विनंती

सकाळ वृत्तसेवा

NEET-PG परीक्षा सप्टेंबरमध्ये झाली होती. परंतु, NEET-PG 2021 च्या समुपदेशनात (काउन्सेलिंग) विलंब होत आहे.

NEET-PG परीक्षा सप्टेंबरमध्ये झाली होती. परंतु, NEET-PG 2021 च्या समुपदेशनात (Counselling) विलंब होत आहे. या विलंबाविरोधात निवासी डॉक्‍टरांनी (Doctor) संप पुकारला आहे. या संपावर चिंता व्यक्त करत, इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association - IMA) ने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ही समस्या सोडवण्यासाठी आणि कोरोना (Covid-19) विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचीही विनंती आयएमएने केली आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आयएमएला निवासी डॉक्‍टरांच्या समर्थनार्थ उतरावे लागेल, असा इशारा डॉक्‍टरांच्या संघटनेने दिला आहे. (IMA urges PM to intervene as NEET PG counselling is delayed)

IMA ने सांगितले की, कायदेशीर अडथळ्यांमुळे समुपदेशन थांबवण्यात आले आहे. परिणामी 45 हजार डॉक्‍टरांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आयएमएने पंतप्रधानांना या प्रकरणात वैयक्तिक हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.

डॉक्‍टरांच्या संघटनेने म्हटले आहे की, 'देशातील साडेतीन लाख डॉक्‍टरांच्या वतीने आम्ही त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या निवासी डॉक्‍टरांना नैतिक पाठिंबा व्यक्त करतो. यासोबतच, आम्ही आरोग्य मंत्रालयाला (Health Ministry) विनंती करतो की, पंतप्रधानांच्या सल्ल्याने आणि हस्तक्षेपाने हे प्रकरण लवकरात लवकर हाताळण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT