jobs sakal
एज्युकेशन जॉब्स

नव्या वर्षात सर्वाधिक नोकऱ्या! 'या' क्षेत्रात आहेत मोठ्या संधी

नव्या वर्षात सर्वाधिक नोकऱ्या! 'या' क्षेत्रात आहेत मोठ्या संधी

सकाळ वृत्तसेवा

नवीन वर्षात जवळपास 50 टक्के कंपन्या नवीन भरती करण्याच्या तयारीत आहेत.

नवीन वर्ष (New Year 2022) व्यावसायिकांसाठी (Professional) चांगले ठरणार आहे. नवीन वर्षात जवळपास 50 टक्के कंपन्या नवीन भरती (Recruitment) करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील. मॅनपॉवर ग्रुपच्या (Manpower Group) सर्व्हेनुसार ही बाब पुढे आली आहे. सर्व्हेनुसार, भारतीय कंपन्या (Indian Companies) पुढील तीन महिन्यांत नोकरभरतीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राहण्याची अपेक्षा करतात. मंगळवारी जाहीर झालेल्या सर्व्हेत असे म्हटले आहे, की 49 टक्के कंपन्या जानेवारी-मार्च या तिमाहीत अधिक नियुक्‍त्या करण्याची योजना आखत आहेत. मॅनपॉवर ग्रुपच्या एम्प्लॉयमेंट आऊटलूक सर्व्हेनुसार (Employment Outlook Survey), गेल्या आठ वर्षांत भारतातील भरतीचे वातावरण सर्वात अनुकूल आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत यात पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. (In the new year, a large number of new employees will be recruited from January to March)

64 टक्के कंपन्या कर्मचारी वाढवण्याच्या तयारीत

सर्व्हे केलेल्या 3,020 कंपन्यांपैकी 64 टक्के कंपन्यांनी सांगितले, की ते कर्मचारी संख्या वाढवू शकतात. 15 टक्के कंपन्यांनी कर्मचारी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर 20 टक्के कंपन्यांच्या मते त्यात कोणताही बदल होणार नाही. अशा प्रकारे निव्वळ रोजगार परिस्थिती 49 टक्के आहे.

देशातील शहरी बेरोजगारीने गाठला दोनअंकी आकडा

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अहवालानुसार, देशातील बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा दुहेरी अंकावर पोहोचला आहे. CMIE च्या मते, 17 आठवड्यांत प्रथमच 12 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारीचा दर 10.09 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला, ज्यामुळे देशाचा एकूण बेरोजगारीचा दर नऊ आठवड्यांच्या उच्चांकी 8.53 टक्‍क्‍यांवर पोहोचला.

मोठ्या कंपन्यांमध्ये उत्साह

सर्व्हेत समाविष्ट मोठ्या कंपन्यांचे कर्मचारी अधिक आशावादी असल्याचे दिसते. पहिल्या तिमाहीत मोठी कर्मचारी भरती होईल, 51 असे टक्के लोकांना वाटते. पहिल्या तिमाहीत मोठी भरती होईल, असा विश्वास छोट्या कंपन्यांच्या 25 टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत उत्तर भारतात सर्वाधिक भरती होण्याची अपेक्षा आहे.

आयटी, टेक्‍नॉलॉजीमध्ये सर्वाधिक रिक्त जागा

सर्व्हेनुसार, डिजिटल नोकऱ्यांना (Digital Jobs) सर्वाधिक मागणी आहे. आयटी (IT), तंत्रज्ञान (Technology), दूरसंचार (Telecommunications), दळणवळण आणि मीडिया (Media) क्षेत्रात 60 टक्के भरती होण्याचा अंदाज आहे. त्याखालोखाल रेस्टॉरंट्‌स (Restaurant) आणि हॉटेल्सचा (Hotels) क्रमांक 56 टक्के असून 52 टक्के बॅंकिंग (Banking), वित्त (Finance), विमा (Insurance) आणि रिअल इस्टेटचा (Real Estate) क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT