India Post Recruitment 2022  esakal
एज्युकेशन जॉब्स

India Post Recruitment 2022: पोस्ट विभागाने 650 पदांसाठी मागवले अर्ज; पगार 30,000 रुपये

पोस्ट विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB), पोस्ट विभाग, संचार मंत्रालयामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

IPPB GDS Recruitment 2022: भारतीय टपाल विभागात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB), पोस्ट विभाग, संचार मंत्रालयामध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 650 पदे भरली जातील. या पदांसाठी अद्याप अर्ज न केलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे.

याशिवाय, उमेदवार थेट https://ibpsonline.ibps.in/ippbgdsapr22/ या लिंकद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच, https://www.ippbonline.com/documents/31498/132994 या लिंकवर क्लिक करून, तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.

महत्त्वाच्या तारखा-

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 10 मे 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 मे 2022

रिक्त जागांचा तपशील-

ग्रामीण डाक सेवक – 650

पात्रता निकष-

भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / बोर्ड मधून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, GDS म्हणून किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा-

उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.

अर्ज शुल्क-

उमेदवारांना रु. 700/- भरावे लागतील.

पगार-

उमेदवारांना रु. 30,000/- दरमहा दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! इराणवर हल्ला थांबवून २ आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू

Parbhani News: खासगी भूमापक सोडविणार जमिनीचा गुंता!; तीस दिवसांत मोजणी करण्याचे आदेश, पण तातडीने अंमलबजावणी होणार का?

Manipur Violence: मणिपूरमध्ये बाँबहल्ल्यात दोन भावंडांचा मृत्यू; गोळीबारात दोन आंदोलकांचाही मृत्यू, पाच जिल्ह्यांत ‘इंटरनेट’ बंद!

मतदार मॅपिंगसाठी ‘बीएलओं’नी नेमल्या खासगी व्यक्ती? मतदारांचे मॅपिंग सुरु, मतदार पत्त्यावर नसल्यास कमी होणार नाव; ‘या’ मतदारांची होणार सुनावणी

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांवरील शिक्षकांचे १०० टक्के अनुदानित शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांच्या जागेवर होणार समायोजन; आदेश नेमके काय? वाचा...

SCROLL FOR NEXT