Indian_Army 
एज्युकेशन जॉब्स

Indian Army Recruitment: तरुण-तरुणींसाठी भारतीय सैन्यात भरतीची सुवर्णसंधी, आताच करा अर्ज

सकाळ डिजिटल टीम

Indian Army Recruitment 2021: तरुण-तरुणींना देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी भारतीय सेनेने उपलब्ध करून दिली आहे. सैन्यातील अनेक पदांवर महिला तसेच पुरुषांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अधिसूचना (Notification) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त पदांचा तपशील तुम्हाला भारतीय सेनेच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. 

ही भरती नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) च्या विशेष प्रवेश (Special Entry) अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. अधिसूचना आणि अर्जाचा तपशील पुढे दिला आहे. 

पदाचे नाव - एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 49 वा कोर्स
पदांची संख्या - 55 (पुरुषांसाठी 50 आणि महिलांसाठी 5 जागा)
वेतनश्रेणी - भारत सरकारच्या वेतनश्रेणी -10के नुसार वेतन देण्यात येणार आहे.

पात्रता -
देशातील कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. एनसीसीकडून 'सी' प्रमाणपत्र मिळलेले असावे. वय १९ ते २५च्या दरम्यान असावे. आरक्षित वर्गांना गुणांची टक्केवारी आणि वयोमर्यादेमध्ये सवलतीचा लाभ मिळेल.

असा करा अर्ज 
भारतीय सेनेच्या या रिक्त जागांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 30 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे. यासाठी कोणतीही फॉर्म फी नाही.

अशी होणार निवड
अर्जांची पडताळणी, मुलाखत (SSB Interview) आणि भारतीय लष्कराची वैद्यकीय परीक्षा या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय सैन्य एनसीसी अधिसूचना 2021 पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Ganpati Visarjan 2025 Live Updates : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जुहू चौपाटीवर निर्माल्य गोळा करण्याचे काम

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT