Indian corporate employees
Indian corporate employees Esakal
एज्युकेशन जॉब्स

Salary Hike: मोठा दिलासा! कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचार्‍यांना मिळणार तब्बल 30 टक्के पगारवाढ

सकाळ डिजिटल टीम

Salary Hike: मार्च एप्रिल महिना जवळ आला की,कॉर्पोरेट कर्मचारी पगार वाढीकडे लक्ष्य ठेवून असतात. एकीकडे बेरोजगारीचा दर 16 महिन्यांतील उच्चांकावर असताना (8 टक्के) दुसरीकडे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना मात्र भरघोस पगार वाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सप्टेंबरपर्यंत 20 टक्के नोकर्‍या कमी झालेल्या भारतीय आयटी क्षेत्राने आता नोकरी भरतीमध्ये 96 टक्क्यांनी कपात केली आहे. कारण जागतिक मंदीचा फटका आयटी क्षेत्राला बसला आहे. बहुराष्ट्रीय कर्मचार्‍यांच्या या कठीण परिस्थितिच्या दरम्यान, भारतीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा 2023 मध्ये पगार 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

भारतीय कॉर्पोरेशन्समधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15 ते 30 टक्क्यांदरम्यान वेतनवाढ मिळू शकते, जी आशियातील सर्वोच्च मानली जाते.

इंडिया इंकच्या कर्मचार्‍यांसाठी सरासरी पगारवाढ 10 टक्क्यांच्या जवळपास असेल. 818 कंपन्यांच्या जागतिक सर्वेक्षणातून हे निकाल हाती आले आहेत, जिथे आठ लाख लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

आत्तापर्यंत, मुंबई, बेंगळुरू आणि दिल्ली सारख्या मोठ्या मेट्रो शहरांमधील कर्मचार्‍यांना भरघोस पगार मिळत आहे, परंतु आता कामाचं ठिकाण ही कंपन्यांसाठी मोठी चिंता राहणार नाही.

जरी भारतातील कंपन्यांमधील कर्मचांऱ्यासाठी वेतनात वाढ होत असली तरी, देशातील केवळ 4 टक्के कर्मचारी औपचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत, तर 90 टक्के अनौपचारिक क्षेत्रात काम करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

Mumbai Indians: 'निराशाजनक सिजन होता, पण...', नीता अंबांनीचा मुंबईच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित-हार्दिकलाही खास मेसेज

Latest Marathi News Live Update: ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.08 टक्के..

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT