ITBP Recruitment  google
एज्युकेशन जॉब्स

ITBP Recruitment 2022 : आयटीबीपीमध्ये ४० हेड कॉन्स्टेबल पदांवर भरती सुरू

ITBP ने हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटरनरी) पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

नमिता धुरी

मुंबई : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ITBP ने हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटरनरी) पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या रिक्त पदांमधून एकूण ४० पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२२ आहे.

पदनाम

हेड कॉन्स्टेबल

एकूण पदांची संख्या - ४० पदे

पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेले असावे. नियमित पॅरा व्हेटर्नरी कोर्स किंवा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी चाचणी, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल.

अर्ज फक्त ऑनलाइन असेल

उमेदवारांचे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. कोणताही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. ज्या उमेदवारांचे अर्ज योग्य आढळले त्यांना भरती परीक्षेत बसण्यासाठी प्रवेशपत्र दिले जातील.

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Extension : अमेरिकेत नोकरी करणाऱ्या हजारो H-1B व्हिसाधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भारतीयांवर थेट परिणाम

Supriya Sule: 'माझा भाऊ गेला, त्याच दिवशी विलीनीकरणाचा विषय संपला'; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

IND vs NZ 4th ODI Live: हायव्होल्टेज ड्रामा! गुरनूर ब्रार अन् न्यूझीलंडचा फलंदाज भिडले, विराटने गोलंदाजाला मागे खेचले नाहीतर... Video Viral

Latest Marathi News Live Update : पुण्यातील झेड ब्रीज खाली फटाक्यांमुळे टेम्पोला आग

Rare Shekru Spotted in Marleshwar : मार्लेश्वरच्या घनदाट जंगलात घडले महाराष्ट्राच्या राज्यप्राण्याचे दुर्मीळ दर्शन; 'शेकरू'ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT