Satara Latest Marathi News Education News 
एज्युकेशन जॉब्स

दिल्लीच्या जेएनयूचे नाव 'स्वामी विवेकानंद विद्यापीठ' होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती

सिध्दार्थ लाटकर

सातारा : सध्या रेल्वे स्थानकांपासून शहरांची आणि अगदी फळांची नावे बदलण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. या चढाओढीत आता दिल्लीतील सुपरिचित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) नामकरणाचा मुद्दा पुढे आला. केंद्र सरकारही जेएनयूचे नाव बदलणार आहे? याबाबत दस्तुरखुद्द केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी लोकसभेत अशी माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी भाजपचे सरचिटणीस सीटी रवी यांनी जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) विद्यापीठ असे करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी ट्विट केले होते. 'स्वामी विवेकानंद' हेच भारताच्या विचारधारेचे समर्थन करणारे होते. त्यांचे तत्वज्ञान आणि मूल्ये भारताची शक्ती प्रतिबिंबित करतात. त्यामुळेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव स्वामी विवेकानंद व्हावे हेच योग्य ठरेल. या महापुरुषाच्या कार्याची, देशप्रेमाच्या विचारधारेची नवीन पिढी प्रेरणा घेईल असे सीटी रवी यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते.

सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये सोमवारी (ता. आठ) लोकसभेत एक प्रश्न विचारण्यात आला की, 'जेएनयूचे नाव बदलण्याचा सरकारचा काही प्रस्ताव आहे का? त्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांनी नाही, असे उत्तर देत जेएनयूचे नाव बदलण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही हे स्पष्ट केले.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर-बंगळुरू विमानाचे उड्डाण वेळेवर रद्द, प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Australia A Squad: 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'आधी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय;३५ वर्षीय खेळाडूला दिले भारत दौऱ्याचे तिकीट!

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

SCROLL FOR NEXT