Mobile Tower
Mobile Tower Esakal
एज्युकेशन जॉब्स

पुढील दोन वर्षांत टेलिकॉम क्षेत्रात होणार बंपर भरती !

श्रीनिवास दुध्याल

देशातील बहुप्रतीक्षित 5-जी सेवा सुरू झाल्यामुळे येत्या दोन वर्षांत दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती होण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर : देशातील बहुप्रतीक्षित 5-जी सेवा सुरू झाल्यामुळे येत्या दोन वर्षांत दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती (Jobs in telecom Sector) होण्याची शक्‍यता आहे. टीमलीजच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही सेवा सुरू झाल्यामुळे दूरसंचार क्षेत्रात (Indian Telecom Sector) मोठ्या संख्येने कंत्राटी नोकऱ्या (Telecom Jobs) मिळतील. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात 5-जीमुळे या क्षेत्रात सर्वाधिक भरती होईल. दूरसंचार विभागाने (DOT) या महिन्याच्या सुरवातीस 5-जी चाचण्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत विभागाने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांचे अर्ज चाचणीसाठी स्वीकारले होते. (jobs-alert-bumper-hiring-activities-can-take-place-in-telecom-sectors-next-two-years)

टीमलीज सर्व्हिसेसचे बिझनेस हेड (टेलिकॉम, आयटी आणि आयटीईएस, मीडिया आणि गव्हर्नमेंट) देवल सिंग म्हणाले की, टेलिकॉम सेक्‍टरमध्ये कंत्राटी नियुक्‍त्यांबाबत (Telecom sector Job) परिस्थिती सकारात्मक आहे. सिंग म्हणाले, "टेलिकॉम वर्टिकल हे स्टाफिंग इंडस्ट्रीच्या दृष्टीने सर्वात मोठे बाजारपेठ आहे. कोव्हिडच्या काळातही वृद्धी आहे. आम्हाला आशा आहे की 2021 मध्येही ही वृद्धी कायम राहील. भविष्यात 5-जी सुरू झाल्याने लेबर मार्केट (Labour Market) व अर्थव्यवस्थेला (Economy) चालना मिळेल.'

टीमलीजच्या मते, यावर्षी टेलिकॉम क्षेत्रात नवीन प्रतिभेच्या गरजांमध्ये 18 टक्‍क्‍यांची वाढ दिसून येईल. तंत्रज्ञ, इन्स्टॉलेशन इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर ते प्रकल्प व्यवस्थापक या प्रोफाईलमध्ये या क्षेत्रात भरती होणार आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे, की दूरसंचार क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीमध्ये 2020 मध्ये लॉकडाउन आणि लोकांच्या हालचालींवर निर्बंध वाढले आहेत. यामागचे कारण असे आहे, की घरातून किंवा दूरदूरच्या कामापासून आणि सोशल डिस्टन्सिंगशी संबंधित नियमांमुळे डेटाची आवश्‍यकता वाढली आहे. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करावी लागली. लॉकडाउन दरम्यान दूरसंचार सेवा अत्यावश्‍यक सेवा म्हणून ओळखली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT