JEE Main Result 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main : मजूर आई-बापाच्या पोरानं JEE परीक्षेत मिळवले 99.93 टक्के गुण

'केवळ नाव दीपक नाही, तर 'दिवा' बनून आई-वडिलांचं आणि शहराचं नाव दीपकनं रोशन केलंय.'

सकाळ डिजिटल टीम

'केवळ नाव दीपक नाही, तर 'दिवा' बनून आई-वडिलांचं आणि शहराचं नाव दीपकनं रोशन केलंय.'

JEE Main Result 2022 : ही संघर्ष आणि यशाची कहाणी आहे. केवळ नाव दीपक नाही, तर 'दिवा' बनून आई-वडिलांचं आणि शहराचं नाव दीपकनं रोशन केलंय. कष्टकरी वडिलांच्या होतकरू मुलानं यशाचा असा टप्पा गाठलाय की, जो एक विक्रम ठरलाय. ही गोष्ट आहे देवासच्या दीपक प्रजापतीची (Deepak Prajapati), ज्यानं नुकतंच 'जेईई मेन'मध्ये मोठं यश संपादन केलंय.

वयाच्या सातव्या वर्षी वर्गात 'ढ' ठरवण्यात आलेल्या मजुराच्या मुलानं JEE च्या मुख्य परीक्षेत तब्बल 99.93 टक्के गुण मिळवत सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय. मध्यप्रदेशातील इंदौर शहरात राहणाऱ्या दीपक प्रजापती या विद्यार्थ्याच्या यशाच्या कहाणीची देशभरात चर्चा सुरूय. यशस्वी होण्याची दुर्मम्य इच्छाशक्ती, संयम आणि अभ्यासातील सातत्यामुळं अनेक लोकांनी दीपकचं कौतुक केलंय.

दीपकचे वडील, राम इकबाल प्रजापती हे वेल्डर म्हणून काम करतात, त्यांच्याकडं स्थिर काम नाही आणि ते उदरनिर्वाहासाठी वेगवेगळी नोकरी करत असतात. दीपकनं आपल्या अभ्यासात सातत्यानं सुधारणा केली आणि दहावीत 96 टक्के मिळवले. यामुळं त्याच्या सरकारी समुपदेशकांच्या लक्षात आले, ज्यांनी त्याला करिअरचे पर्याय दाखवले. तो म्हणाला, “मला अभियांत्रिकीच्या संकल्पनेचे आकर्षण आहे, म्हणून मी स्वत:ला वचन दिलं की मी आयआयटी-कानपूरमध्ये संगणक विज्ञान अभियांत्रिकीचा अभ्यास करेन. त्यानं आपल्या पालकांना सांगितलं की जेईईची तयारी करण्यासाठी त्याला इंदौरला जायचं आहे. त्यांनीही होकार दिला.

वडिलांचा त्याग

दीपकचे वडील राम प्रजापती (Ram Prajapati) मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाला उच्च शिक्षण मिळावं म्हणून वडिलांनी नातेवाइकांकडून पैसे घेतले आणि चांगल्या कोचिंगसाठी मुलाला इंदौरमधील खासगी कोचिंग संस्थेत पाठवलं. दीपक सरकारी शाळेतून 10 वीमध्ये 96 टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आणि नंतर 12 वीमध्ये 92.6 टक्के गुण मिळवले. सोमवारी आलेल्या जेईई मेनच्या निकालात (JEE Main Result) दीपकनं 99.93 टक्के मिळवून आई-वडिलांचं स्वप्न साकार केलंय.

वडिलांनी घेतलं कर्ज

पैशाअभावी सुरुवातीला काही अडचणी आल्या. अकरावीपासून दीपकनं घरीच जेईईची तयारी सुरू केली. त्याचं समर्पण पाहून वडील राम प्रजापती यांनी नातेवाइकांकडून आर्थिक मदत घेतली आणि दीपकला चांगल्या शिक्षणासाठी इंदौरला पाठवलं. इंदौरमध्ये 9 महिने शिक्षण घेतल्यानंतर दीपकनं जेईई मेनमध्ये 99.93 टक्के गुण मिळवले.

मुख्यमंत्र्यांचं आईनं मानलं आभार

दीपकची आई अनिता प्रजापती यांनी सांगितलं की, त्यांचं संपूर्ण कुटुंब एका छोट्या भाड्याच्या घरात राहतं. वडील राम प्रजापती हे मजूर आहेत. एक लहान भाऊ आणि लहान बहीण देखील आहे. सीएम शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनीही दीपकच्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन केलंय. दीपकच्या आईनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानत म्हटलं की, माझ्या मुलाचं पुढील शिक्षण आपणच बघायला हवं, असं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT