jobs in IT 
एज्युकेशन जॉब्स

Positive News: इंजिनीअर्सना अच्छे दिन; टीसीएस, इन्फोसिस, विप्रोमध्ये भरपूर संधी

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिध्द कंपन्या TCS, Infosys and Wipro आता पुन्हा मोठ्या संख्येने नोकरभरती करण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रभाव उतरल्याने बाजारतील मागणीत काही प्रमाणात वाढ झाल्याने या कंपन्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील 2-3 आठवड्यापासून उतरत आहे.  

या तिन्ही कंपन्यांनी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या एकूण हेडकाउंटमध्ये अनुक्रमे वाढ झाल्याचे सांगितले आहे. हेडकाउंट वाढणे हे आयटी कंपन्यांच्या वाढीचे एक सकारात्मक निदर्शक मानले जाते. या तिन्ही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नतीही जाहीर केली आहे. दुस-या तिमाहीतील या कंपन्यांची कमाई विश्लेषकांच्या वर्तवलेल्या अपेक्षेपेक्षा पुढे आहे.

कोरोनाकाळात TCS ने जवळपास 8 हजार फ्रेशर्सची भरती कंपनीत केली आहे. या भरतीची जवळपास सगळी प्रोसेस ऑनलाईनच झाली आहे. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन कंपनीच्या दुस-या तिमाहीतील कमाईनंतर ही माहिती दिली आहे.

इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूबी प्रवीण राव यांनीही नवीन भरतीचे संकेत दिले आहेत. राव यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात नवीन लोकांची गरज आम्हाला भासणार आहे. मागील तिमाहीत इन्फोसिसमध्ये 5,500 जागा भरायच्या होत्या. त्यातील काही भरल्या आहेत. पुढील तिमाहीत जर कंपनीची चांगली वाढ झाली तर नोकरभरती होण्याची शक्यता आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT