एज्युकेशन जॉब्स

MPSC उमेदवारांनो लक्ष द्या! वेबसाईटवरील प्रोफाईल करावं लागणार अपडेट

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) होणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का!, किंवा परीक्षेच्या तयारीला लागणार आहात का! आणि तुम्ही एमपीएससीच्या संकेतस्थळावर तुमचे ‘प्रोफाईल’ यापुर्वी केले आहे का! अहो, मग आता तुम्हाला संकेतस्थळावरील तुमचे प्रोफाईल अद्यायावत करावे लागणार आहे. अद्यायावत करण्याची सुविधा शुक्रवारी (ता.२८) सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या सेवेतील विविध पदांवरील भरतीसाठी संबंधित विभागांच्या मागणीनुसार आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यासाठी उमेदवारांकडून येणाऱ्या अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था आयोगाने २०१०मध्ये कार्यन्वित केली. प्रणालीच्या विकसन, सुधारणा आणि देखाभालीच्या कामासाठी मेसर्स महाऑनलाइन लिमिटेड या सेवा पुरवठादार संस्थेची २०१३मध्ये नियुक्ती केली होती. आता या कामासाठी अन्य संस्थेची नियुक्ती केली आहे. (MPSC candidates will have to update their profile on Website)

नव्याने विकसित केलेल्या प्रणालीत अद्यायावत तंत्रज्ञानाच्या आधारे उमेदवारांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ही नवी प्रणाली कार्यन्वित करताना उमेदवारांनी यापुर्वीच्या प्रणालीतील त्यांच्या प्रोफाइलमधील माहिती आणि त्यांच्या खात्याचे पासवर्ड अद्यायावत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील प्रोफाईल उमेदवारांना वापरता येणार नाही, असे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान सहसचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. प्रोफाईल अद्यायावत करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. परंतु एखाद्या भरतीच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पासवर्ड रिसेट करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले.

आयोगाच्या संकेतस्थळावर असे करा प्रोफाइल अद्यायावत :

- आयोगाच्या‘https://mpsconline.gov.in’ या संकेतस्थळावर ‘नोंदणी’ वर जाऊन ‘फरगॉट/रिसेट पासवर्ड’ बटणवर क्लिक करा.

- यूजर नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. निवडलेल्या पर्यायानुसार आयोगाच्या नोंदणीकृत वैध युजन नेम, ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करावा.

- तुम्ही दिलेल्या वैध युजन नेम, ई-मेल किंवा मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

- मिळालेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.

- त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी आयोगाकडे नोंदणीकृत असलेली जन्मदिनांक टाका आणि सबमिट करा.

- सबमिट बटणावर क्लिक केल्यावर पासवर्ड रिसेट करा अशी स्क्रिन दिसेल. याद्वारे आपल्या पसंतीचा नवीन पासवर्ड तयार करावा.

- पासवर्ड रिसेट झाल्यावर नवीन ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे नोंदणीकृती ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक तसेच नवीन पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल.

तांत्रिक अडचण आल्यास येथे करा संपर्क

आयोगाच्या नव्या प्रणालीवर प्रोफाईल अद्यायावत करताना तांत्रिक अडचण आल्यास ‘१८००२६७३८८९’ किंवा ‘१८००१२३४२७५’ टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा.

- तसेच ‘support-online@mpsc.gov.in’ ई-मेलवर संपर्क करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT