MPSC Esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

नामदेव कुंभार

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना परीक्षांची माहिती आणि इतर महत्वाच्या अपडेट्स साठी एमपीएससीने मोठं पाऊल उचलले आहे. शुक्रवारी MPSC ने आपलं अधिकृत ट्विटर हँडल सुरु केलं आहे. या द्वारे विद्यार्थांना स्पर्धा परीक्षासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.

शुक्रवारी (२७ ऑगस्ट) संध्याकाळी एमपीएससीने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या ट्विटर खात्यावरुन महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील, असं एमपीएसीमार्फत सांगण्यात आलं आहे. एमपीएससीने आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे, एमपीएससीचे ट्विटर हँडल पहिल्याच ट्विटनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी हा रिप्लायचा पर्याय बंद करण्यात आल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घाबरताय का?, असाही प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान, आयोगामार्फत दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संकेत स्थळावरील सूचनांनुसार उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेपूर्वी उपलब्ध करून घ्यावीत. असे एमपीएससीने ट्विट करत सांगितलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT