NEET UG 2022
NEET UG 2022 Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET-UG 2022 : नोंदणीची अंतिम मुदत पुन्हा वाढवली

सकाळ डिजिटल टीम

NEET UG 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) NEET UG 2022 साठीची नोंदणीची अंतिम मुदत पुन्हा वाढवली असून, विद्यार्थ्यांना आता NEET 2022 परिक्षेसाठी 20 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिसूचना जारी कऱण्यात आली आहे. यापूर्वी, NEET UG अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2022 होती. दरम्यान, ज्या उमेदवारांना NEET UG साठी बसायचे आहे ते neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकणार आहेत. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालकांकडून (AFMS) प्राप्त झालेल्या विनंतीनंतर NEET UG नोंदणीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. (NEET UG 2022 Registration Date Extended )

जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत NTA ने म्हटले आहे, दिनांक 01 मे 2022 आणि 05 मे 2022 च्या सार्वजनिक सूचनेनुसार आणि महासंचालक सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, NEET UG 2022 साठीची अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (How To Apply NEET UG 2022)

NEET UG 2022 साठी अर्ज कसा करावा

1- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम NTA च्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. "NEET UG 2022 साठी नोंदणी या लिंकवर क्लिक करा.

3. स्वतःची नोंदणी करा आणि NEET UG अर्ज भरा.

4. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक शुल्काचा ऑनलाइन भरणा करावा.

5. अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घ्यावी.

नीट परीक्षेचे स्वरूप

NTA तर्फे 17 जुलै 2022 रोजी NEET UG परीक्षा आयोजित करणार. ही परीक्षा पेन आणि पेपरवर आधारित असेल. तसेच प्रश्नपत्रिकेत 200 प्रश्न असतील. ज्यासाठी 200 मिनिटांच्या कालावधी देण्यात येईल. NEET UG परीक्षा देशातील सुमारे 543 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 14 शहरांमध्ये घेतली जाणार असून, ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूसह 13 भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी किती फी?

NEET 2022 साठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1,600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे, तर सामान्य-EWS, OBC-NCL श्रेणीतील उमेदवारांना 1,500 रुपये नोंदणी शुल्क भरून अर्ज भरता येणार आहे. (NEET UG 2022 Registration Fees )

लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही नीट परीक्षा

ज्या महिला उमेदवारांना AFMS वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये B.Sc (नर्सिंग) अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनादेखील NEET UG 2022 साठी अर्ज करावा लागणार असून, AFMS संस्थेबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवार joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. तसेच 011-40759000 या नंबरवर फोन करून किंवा neet@nta.ac.in यावर ईमेल करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT