UGC Gallery
एज्युकेशन जॉब्स

UGC मध्ये NET पात्र उमेदवारांना नोकरीची संधी! 80 हजार रुपये वेतन

यूजीसीमध्ये NET पात्र उमेदवारांना नोकरीची संधी! दरमहा 80 हजार रुपये वेतन

श्रीनिवास दुध्याल

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), नवी दिल्लीने शैक्षणिक सल्लागार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोलापूर : यूजीसीमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission - UGC), नवी दिल्लीने शैक्षणिक सल्लागार पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. कराराच्या आधारावर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. आयोग महिन्याच्या शेवटी म्हणजेच 31 ऑक्‍टोबर 2021 रोजी या पदासाठी नोंदणी विंडो बंद करेल. अशा परिस्थितीत, कोणताही उमेदवार ज्याला या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, म्हणून वेळेत अर्ज करावा.

याप्रमाणे करा अर्ज

उमेदवारांनी प्रथम UGC च्या ugc.ac.in/jobs या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. मग रिक्रूटमेंट / करिअर टॅबमध्ये, अर्ज ऑनलाइन लिंकवर क्‍लिक करा. आता आवश्‍यक तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर माहिती काळजीपूर्वक तपासा आणि सबमिटवर क्‍लिक करा. आता प्रिंटआऊट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत आपल्याकडे ठेवा.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NET परीक्षेसह पात्र असलेल्या कोणत्याही विषयात मास्टर डिग्रीमध्ये प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. याशिवाय, उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

या पदासाठी परीक्षेचा कालावधी किमान सहा महिने आहे, जो कामगिरीच्या पुनरावलोकनाच्या आधारावर वाढवता येतो. पुढे यूजीसीला कोणतेही कारण न देता करार कधीही संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

असे असेल वेतन

निवडलेल्या उमेदवाराला मासिक वेतन 70 ते 80 हजार रुपयांदरम्यान मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT