NITI_Aayog 
एज्युकेशन जॉब्स

निती आयोगात नोकरीची मोठी संधी; पगार ६० हजार!

सकाळ डिजिटल टीम

Niti Ayog Recruitment: पुणे : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर निती आयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. ज्यांना निती आयोगामध्ये भरती व्हायचं आहे, त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

यंग प्रोफेशनल्सकडून निती आयोगाला खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी तुमच्याकडे फक्त इंजिनिअरिंगची पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) असणे आवश्यक आहे. एकूण १० पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही नोकरी दोन वर्षांच्या करार पद्धतीनुसार असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२१ आहे. त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

ज्या १० पदांवर यंग प्रोफेशनल्स भरती करावयाचे आहेत त्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. रिक्त पदांवर भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला मुलाखतीच्या आधारे अंतिम नियुक्ती पत्र दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार देण्यात येईल. रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्जासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. निवड झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना दिल्लीत नोकरी दिली जाईल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा
अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT