open university Google
एज्युकेशन जॉब्स

मुक्‍त विद्यापीठाच्‍या ऑनलाईन परीक्षेला राज्‍यभरात सुरवात

अरुण मलाणी

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) ऑनलाइन परीक्षेला (Online Exam) मंगळवार (ता.१०) पासून सुरवात झाली आहे. एक हजार ३७६ अभ्यासक्रमांतून राज्‍यभरातील सुमारे सहा लाख विद्यार्थी या परीक्षेला समोरे जात आहेत.

यासंदर्भात विद्यापीठातर्फे माहिती जारी केली आहे. त्‍यानुसार विषयाप्रमाणे दिवसभरात दोन सत्रे या पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. विषयनिहाय परीक्षा किती तारखेला, किती वाजता, कुठल्‍या लॉगीन स्‍लॉटमध्ये आहे, याची खात्री करुन विद्यार्थ्याने वेळेत परीक्षेला सुरवात करण्याच्‍या सूचना विद्यापीठाने दिल्‍या आहेत. लॉगीन स्‍लॉटकरीता पाच तासांचा कालावधी असला तरी प्रत्‍यक्ष परीक्षेचा वेळ साठ मिनीटे असेल. सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते रात्री आठ असे सत्रांचे वेळ निर्धारीत केलेले आहेत. परीक्षा कालावधीत परीक्षेसंदर्भात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय केंद्रावर विद्यापीठ प्रतिनिधीची नियुक्‍ती केली आहे. यासंदर्भातील संपर्काची माहिती संकेतस्‍थळावर उपलब्‍ध केली असून, विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन केले आहे.

असे आहे परीक्षेचे स्‍वरुप

विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपलब्‍ध पन्नास प्रश्‍नांपैकी तीस प्रश्‍न एक तासात सोडवायची आहेत. प्रत्‍येक प्रश्‍नाला दोन गुण याप्रमाणे साठ गुणांसाठी ऑनलाइन परीक्षा होईल. आणि या ६० गुणांचे रुपांतर ऐंशी गुणांमध्ये करतांना अंतीम निकाल जाहिर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमध्ये लवकरच मोठा फेरबदल, धर्मेंद्र प्रधान यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री? कोणत्या मंत्र्याला मिळणार डच्चू?

Raju Navghare: आमदार राजू नवघरे नाशिक-अहिल्यानगर दौऱ्यावर; विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांचा घेणार आढावा

Phulambri Medical Waste: सार्वजनिक ठिकाणी सिरिंज, इंजेक्शनच्या बाटल्या; फुलंब्रीतील शिवमनगरी परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

IPO News: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! Shiprocket अन् Behari Lal Engineering ची बंपर लिस्टिंग; कुणाला सर्वाधिक रिटर्न?

SCROLL FOR NEXT