Railway 
एज्युकेशन जॉब्स

Railway Jobs: रेल्वेमधील नवीन पदभरती संकटात; एकाच विभागात होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रेल्वे बोर्डाने नुकतीच नवीन पद भरती करण्याचा आदेश जारी केला आहे. याअंतर्गत, रेल्वेमध्ये नवीन धोरणे कोणत्या धोरणांच्या माध्यमातून तयार केली जातात त्याचा आढावा घेतला जाईल. रेल्वेमधील सुरक्षा संबंधित पदे या आढावा धोरणापासून वेगळी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत इतर सर्व नवीन पदांची भरती थांबविली गेली आहे.

प्रॉडक्शन युनिट आणि इतर विभागांसह रेल्वेच्या सर्व महाव्यवस्थापकांना रेल्वे बोर्डाच्या वरील निर्णयांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या मुख्य कार्मिक अधिकारी कार्यालयाने आपल्या सर्व विभागीय प्रमुखांना या आदेशांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

रेल्वेने जारी केलेल्या पत्रानुसार, सुरक्षेच्या बाबतीत नवीन पदे तयार करण्याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. म्हणजेच पूर्वीप्रमाणे नवीन पदांवर भरती प्रक्रिया सुरूच राहणार आहे. याशिवाय रेल्वेतील इतर सर्व विभागांमध्ये नवीन पद भरती करण्यास बंदी घातली आहे.

गेल्या दोन वर्षात तयार केलेल्या सर्व नवीन पोस्टचा आढावा घेतला जाईल. मंजूर झालेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसेल, तर ती पदे रद्द करण्याच्या उद्देशाने आढावा घेतला जाईल. रिक्त असलेल्या जागांपैकी फक्त पन्नास टक्के जागांवर भरती करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे यात सुरक्षिततेशी संबंधित पोस्ट्सचा समावेश नाही.

रेल्वे युनियन प्रतिनिधींना रेल्वेच्या या नवीन निर्णयांची माहिती व्हावी, यासाठी वेळोवेळी विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic update: सुट्टीचा प्लॅन बिघडला! विकेंडच्या सुरुवातीलाच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Thane News: ३०० झाडांची बेकायदा कत्तल! सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर

सगळ्यात कमी वयाची नायिका पडतेय सगळ्यांवर भारी; 'कमळी'ची TRPमध्ये मोठी उडी; जुई गडकरीचं स्थान धोक्यात

Maharashtra Land Revenue Code amendment : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये एन. ए. परवानगीबाबत सुधारणा, कोल्हापूरला होणार मोठा फायदा

पुण्यात मोठी दुर्घटना टळली, 50 प्रवासी असलेल्या PMPML बसने अचानक घेतला पेट, नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT