Indian Railway Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

12वी पास अन् पदवीधरांना Railway मध्ये काम करण्याची संधी! असा करा अर्ज

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Railway Recruitment 2022: तुम्ही जर बारावी किंवा पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं असेल आणि तुम्हाला रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वच्या ईशान्य रेल्वे विभागामध्ये क्रीडा कोट्याअंतर्गत गट क पदांसाठी भरती करत आहेत. एकूण 21 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या ner.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 25 एप्रिल 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतरचे अर्जांचा विचार केला जाणार नाही. (12th Pass, Graduates can apply for job in Railways)

वेतनश्रेणी:

स्तर - 2: ग्रेड पे रु 1900 आणि पे बँड रु 5200-20200

स्तर - 3: ग्रेड पे रु.2000 आणि पे बँड रु.5200-20200

स्तर – 4: ग्रेड पे रु 2400 आणि पे बँड रु. 5200-20200

स्तर - 5: ग्रेड पे रु. 28 आणि पे बँड रु.5200-20200

शैक्षणिक अर्हता:

अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय वरिष्ठ, युवा किंवा कनिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान प्राप्त केलेले असावे.

वयोमर्यादा-

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे ते 25 वर्षे असावे.

निवड प्रक्रिया-

क्रीडा तसेच शैक्षणिक पात्रता तसेच संबंधित खेळाच्या चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

आवेदन शुल्क-

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD), महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 250 रुपये असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT