एज्युकेशन जॉब्स

Railway Recruitment 2022: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार KRCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 14 पदे भरली जातील.

महत्वाच्या तारखा-

मुलाखत तारीख - 11, 13, 14 मे

रिक्त जागांचा तपशील-

  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल): 7 पदे

  • कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल): 7 पदे

पात्रता निकष-

  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल): मान्यताप्राप्त संस्थेतून 60% गुणांसह पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी BE/B.E. टेक (सिव्हिल).

  • कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल): 60% गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून BE/B.E. टेक (सिव्हिल) पदवी.

वयोमर्यादा-

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी 1 मे 2022 रोजी उमेदवारांचे वय कमाल 30 वर्षे, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी 1 मे 2022 रोजी 25 वर्षे असावे.

इतर माहिती-

ही मुलाखत यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंन-त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT) पिन 180011 येथे होणार आहे.

उमेदवार https://konkanrailway.com/ या लिंकवर जाऊन या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही https://konkanrailway.com/uploads/vacancy/1650454339Notification या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : दुबई मरीना बीचचा रोमांच आता थेट मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी अनुभवता येणार

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

Redmi 15C 5G मोबाईल लॉन्च! 'या' तारखेपासून विक्री सुरू; 12 हजारात बेस्ट कॅमेरा अन् 6300 mAh मोठी बॅटरी, 50 हजारच्या फोनचे फीचर्स

SCROLL FOR NEXT