लहानपणी गरिबीचे चटके खाल्ले; मात्र आता 'हा' तरुण करतो कोट्यवधींची उलाढाल
लहानपणी गरिबीचे चटके खाल्ले; मात्र आता 'हा' तरुण करतो कोट्यवधींची उलाढाल Canva
एज्युकेशन जॉब्स

एकेकाळी पायात चप्पलही नव्हते, मात्र आज करतोय कोट्यवधींची उलाढाल!

किरण चव्हाण

वयाच्या चौथ्या वर्षीच वडिलांचे निधन झाले... घरात मोठ्या पाच बहिणी, आई अशी प्रतिकूल आर्थिक आणि भावनिक स्थिती...

माढा (सोलापूर) : वयाच्या चौथ्या वर्षीच वडिलांचे निधन झाले... घरात मोठ्या पाच बहिणी, आई अशी प्रतिकूल आर्थिक आणि भावनिक स्थिती... दररोज आठ किलोमीटरची तर कधीकधी बिगर चप्पलची पायपीट करत माध्यमिक शिक्षण घेतले... बारावीनंतर डीएड (DEd) करून पटकन नोकरी लागत असतानाही काहीसं वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगलेल्या निमगाव (ता. माढा) येथील राजेश चंद्रसेन मुकणे (Rajesh Mukane) हे दोन कृषी विषयक सूक्ष्म अन्नद्रव्ये, औषधे व खतांच्या कंपन्यांची उभारणी करत कोटींची उलाढाल करत आहेत.

राजेश मुकणे यांच्या बालपणीच पित्याचे छत्र हरपले. आजोबा, मामा व चुलते यांनी सांभाळ केला. अशा परिस्थितीतही आई शीला यांनी पाच बहिणी व राजेश यांच्यावर चांगले संस्कार करत मोठे केले. मुकणे यांचे प्राथमिक शिक्षण निमगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी दारफळ येथील नवभारत विद्यालयात दररोज आठ किलोमीटरची पायपीट करत जावे लागे. उच्च माध्यमिक शिक्षण बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयात केले तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात करत बीएस्सी ऍग्रीची पदवी घेतली. नंतर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षणाऐवजी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरीला प्राधान्य देत सूक्ष्म अन्नद्रव्ये निर्मिती करणाऱ्या नामांकित खासगी कंपनीत राजकोट, गोंडल (गुजरात), सांगली, पुणे, कोल्हापूर येथे नोकरी केली. पुढे राज्याबाहेर बदली होऊ लागल्याने स्वत:ची कंपनी स्थापण्याचा निर्णय घेतला.

सांगली- कुपवाड एमआयडीसीमध्ये 2013 मध्ये शेतीउपयोगी औषधे व सूक्ष्म अन्नद्रव्ये निर्मितीच्या प्रकल्पाची सुरवात केली. सुमारे 27 सहकाऱ्यांना बरोबर घेत व 50 कुटुंबांना रोजगार देत पहिल्या वर्षभरातच एक कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण केले. पुढे व्यवसायवृद्धी होत गेली. शेतीउपयोगी औषधांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यातील ग्रेड नं. 4, ग्रेड नं. 6 ही अन्नद्रव्ये उपलब्ध करणारी राज्यातील पहिली कंपनी म्हणून लौकिक मिळवला. प्रत्येक पिकाला आवश्‍यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांतील झिंक एचईडीपी 17 टक्के, फेरस एचईडीपी 17 टक्के कंपनीने राज्यात प्रथमच उपलब्ध केले. शेतकऱ्यांची गरज ओळखून 2017 मध्ये दुसरी कंपनी सुरू केली. झिंक लिक्विड (झिंकलिक), बोरॉन लिक्विड (बोरोलिक), सिलिफास्ट ऑर्थो सिलिसीक ऍसिड दोन टक्के ही चार उत्पादने कंपनीने नव्याने घेतली. आता पन्नास अधिक लोकांना रोजगार मिळत आहे.

सृष्टी व श्रेया या दोन मुली असलेल्या मुकणे यांनी स्त्री जन्माचे जोरदार स्वागत केले. निमगावमध्ये येत्या काही महिन्यांत पाण्याचा आरओ प्लांट उभा करण्याची तयारी सुरू आहे. गावाभोवती 450 झाडे लावली. कोरोना काळात पंधरा कुटुंबांना दोन महिन्यांचा किराणा माल भरून दिला. बार्शीतील मातृभूमी प्रतिष्ठापनेचे ते सभासद आहेत. कृषी पदवीधर विश्वस्त मंडळाचे मार्गदर्शक आहेत. पदवीधर कृषी मंडळाचा कृषीमित्र व भगवंत कृषीमित्र यासह इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे.

आई, मामा, चुलते, भाऊजी व पत्नीच्या पाठबळाने उभा राहिला व्यवसाय

वडिलांचे अकाली निधन झाल्याने मामा चांगदेव परबत, चुलते महादेव मुकणे यांनी बहिणींची लग्ने लावली व कुटुंब चालवण्यासाठी मदत केली. तर भाऊजी मालोजीराव डमरे यांनी उच्च शिक्षणासाठी मदत केली. स्वतः एमएस्सी ऍग्री असलेल्या सुषमा यांनी पतीला प्रोत्साहन दिले. सुरवातीला अगदी घरातच कंपनीचे ऑफिस सुरू केले होते. व्यवसायात आर्थिक अडचण आल्यास प्रपंच चालावा म्हणून ऍग्रीकल्चर सुपरवायझरची नोकरी आजही करत आहेत. नातलग, सगेसोयरे यांचे श्री. मुकणे यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असून व्यवसायात मोठे झाले तरी सर्व नाती आजही जपण्याचा प्रयत्न करतात.

पायात चप्पल नसल्याने; मोठे व्यवसायिक झाल्यावरही पाय जमिनीवरच

श्री. मुकणे निमगावहून आठ किलोमीटरचे अंतर चालत जाऊन दारफळ येथील नवभारत विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत असत. शाळेतील शिक्षक हनुमंत परबत हे गरीब पण हुशार विद्यार्थी असल्याने शाळेकडून गणवेश देत. संपूर्ण शिक्षण होईपर्यंत स्वतःला गणवेश घेता आला नाही. आठ किलोमीटरच्या पायपिटीने चप्पल लवकर खराब व्हायचे. त्यामुळे पाय पोळू नये म्हणून पायाला कापड बांधायचे व एका झाडाच्या सावलीतून दुसऱ्या झाडाच्या सावलीपर्यंत पळत जायचे. मामा घराचा सगळा प्रपंच भागवत असल्याने चप्पल खराब झाली तर त्यांना सारखे पैसे कसे मागायचे, म्हणून ही शक्कल त्यांना सुचली. तांदूळवाडीत राहणाऱ्या मामाला ही बातमी कळाली की मामा नवी चप्पल घेऊन यायचे. चप्पल अभावी पाय पोळलेल्या मुकणे यांचे व्यवसायात मोठे झाले तरी पाय जमिनीवरच आहेत.

राजशे मुकणे यांचा नवव्यावसायिकांना सल्ला

  • अगोदर नोकरी करून आपणास करावयाच्या व्यवसायाचे सर्व अंगाने ज्ञान अवगत करा.

  • व्यवसायात एकदम मोठी झेप न घेता हळूहळू व्यवसाय वृद्धी करा. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्‍यता कमी होते.

  • निर्व्यसनी राहा.

  • कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ द्या.

  • आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुटुंबाचे सदस्य मानत वागणूक दिल्यास व्यवसाय वृद्धीस मदतच होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT