Parliment
Parliment 
एज्युकेशन जॉब्स

तरुण-तरुणींना राज्यसभेत इंटर्नशिप करण्याची संधी; स्टायपेंडही मिळणार

सकाळ डिजिटल टीम

Rajya Sabha Internship vacancy 2021: नवी दिल्ली : विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठी जागा रिक्त झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तरुण-तरुणींना भारतीय संसदेत काम करण्याची संधी मिळत आहे. 

कोण करू शकेल अर्ज 
राज्यसभा संशोधन आणि अभ्यास (RSRS) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देण्यात येत आहे. कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी यासाठी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपच्या कालावधीत तुम्हाला दरमहा स्टायपेंडही देण्यात येईल.

असा करा अर्ज
राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह rssei.rsrs@sansad.nic.in या आयडीवर मेल पाठवावा लागणार आहे. यासाठीची अधिकृत वेबसाईटची लिंक बातमीच्या तळाशी देण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांनी ३१ मार्च पर्यंत यासाठी अर्ज करायचे आहे. 

एवढा स्टायपेंड मिळणार
राज्यसभेत इंटर्नशिप करण्याचा कालावधी हा दोन महिन्यांचा असणार आहे. यासाठी एकूण १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तसेच प्रत्येक इंटर्नला केंद्र सरकारकडून दरमहा दहा हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.

- Rajyasabha इंटर्नशिपसाठी अधिक माहितीसाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT