RBI Assistant Result 2022
RBI Assistant Result 2022  esakal
एज्युकेशन जॉब्स

रिझर्व्ह बँकेच्या 'या' परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा Result

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहाय्यक भरती परीक्षेचा निकाल जाहीर केलाय.

RBI Assistant Result 2022 : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) सहाय्यक भरती परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. या परीक्षेला बसलेले उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइटवर rbi.org.in जाऊन आपला निकाल पाहू शकतात. RBI नं जाहीर केलेल्या या भरतीद्वारे एकूण 950 पदांची भरती केली जाणार आहे. तसंच भरती प्रक्रियेत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना देशातील विविध शहरांमध्ये असलेल्या आरबीआयच्या शाखांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. एकूण 19 शहरांमध्ये रिक्त पदं भरण्यात आली आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार पुढील संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी वेबसाइटला भेट देऊ शकतात.

RBI द्वारे सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना 8 मार्च 2022 पर्यंत अर्ज सबमिट करण्याची मुदत देण्यात आली होती.

RBI चा निकाल 'असा' तपासा

  • निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम RBI च्या अधिकृत वेबसाइटला rbi.org.in भेट द्या.

  • आता वेबसाइटच्या होम पेजवर उपलब्ध असलेल्या रिक्त जागा/निकालांवर जा.

  • त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असिस्टंट परीक्षा निकाल 2022 वर क्लिक करा.

  • इथं View/Download वर क्लिक करा.

  • आता निकालाची PDF फाईल उघडेल.

  • उमेदवार रोल नंबर आणि नावाच्या मदतीनं निकाल तपासू शकतात.

निवड प्रक्रिया : RBI असिस्टंटची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांची असेल. सर्व प्रथम प्राथमिक परीक्षा होईल. यामध्ये यशस्वी झालेल्यांना मुख्य परीक्षेला बसावं लागेल. त्यानंतर भाषा प्राविण्य चाचणी (LPT) घेतली जाईल.

परीक्षेचा नमुना

मुख्य परीक्षा 200 गुणांची असेल, यामध्ये 200 प्रश्न विचारले जातील. यासाठी उमेदवारांना 135 मिनिटं दिली जातील. या भरतीद्वारे विविध शहरांमध्ये रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कानपूर, लखनौ, अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, तिरुअनंतपुरम, कोची यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT