NHAI Recruitment  esakal
एज्युकेशन जॉब्स

NHAI मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

NHAI Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये (National Highways Authority of India) विविध पदांची भरती केली जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणनं (NHAI) भरतीसंदर्भात नुकतीच अधिसूचना जारी केलीय.

यात डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाऊंट्स) आणि डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) या पदांच्या भरतीसाठी दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्राधिकरणानं प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातींनुसार एकूण 90 पदांसाठी भरती केली जाणार असून या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील अधिसूचनेत देण्यात आलाय.

डेप्युटी मॅनेजर : NHAI नं जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाऊंट्स) पदांपैकी ६ पदे अनारक्षित आहेत, तर 5 पदे ओबीसी (नॉन-क्रिमी लेयर), 3 एससी, 1 एसटी आणि 2 ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कॉमर्स/सीए/ सीएमएमध्ये पदवी असणं गरजेचं आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कामाचा 4 वर्षांचा अनुभव असावा.

डेप्युटी मॅनेजर : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांसाठी जाहिरात केलेल्या 73 पदांपैकी 27 अनारक्षित आणि 21 ओबीसी-एनसीएल, 13 एससी, 5 एसटी आणि 7 जागा ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी राखीव आहेत. इच्छुक उमेदवार NHAI च्या अधिकृत वेबसाइटवर nhai.gov.in उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. डेप्युटी मॅनेजर (फायनान्स आणि अकाऊंट्स) पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर, तर डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांसाठी उमेदवार 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT