AIIMS google
एज्युकेशन जॉब्स

AIIMS Job : एम्समध्ये भरती; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार; मुलाखतींसाठी दोनच दिवस शिल्लक

ही भरती मोहीम AIIMS भटिंडा मधील वरिष्ठ निवासी पदाच्या ७० जागांवर केली जाईल.

नमिता धुरी

मुंबई : AIIMS भटिंडाने ७० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भटिंडा यांनी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार संस्थेत वरिष्ठ निवासी पदावर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. (recruitment in AIIMS job for doctors)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. उमेदवार तपशीलासाठी अधिकृत साइट aiimsbathinda.edu.in पाहू शकतात. हेही वाचा - What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

रिक्त पदांचा तपशील

ही भरती मोहीम AIIMS भटिंडा मधील वरिष्ठ निवासी पदाच्या ७० जागांवर केली जाईल.

पात्रता

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून MD/ MS/ DNB/ PG पदवी आणि इतर पात्रता निकष असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

या मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया / मुलाखत / लेखी चाचणी आयोजित केली जाईल.

पगार

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये ६७ हजार ७०० रुपये वेतन दिले जाईल.

वॉक-इन-इंटरव्ह्यू कधी होईल : उमेदवारांना २१ आणि २२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत कागदपत्रांसह न्यू अॅडमिनिस्ट्रेशन ब्लॉक, मेडिकल कॉलेज बिल्डिंग, AIIMS, भटिंडा येथे पोहोचावे लागेल.

अर्ज फी : या मोहिमेसाठी उमेदवारांना रु. १००० अर्ज फी भरावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT