ISRO Job sakal
एज्युकेशन जॉब्स

ISRO Job : १२वी उत्तीर्णांना थेट इस्रोमध्ये मिळणार नोकरी; पदवीधरांनाही संधी

राखीव प्रवर्गातील उमेदवार तसेच सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी भरती अधिसूचना पाहा.

नमिता धुरी

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सतीश धवन स्पेस सेंटरने (SDSC SHAR) विविध वेतन-मॅट्रिक्स स्तरांवर एकूण ९२ पदांवर भरती सुरू केली आहे. या पदांमध्ये तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन यांचा समावेश आहे.

बुधवार २६ एप्रिल २०२३ पासून SDSC ने या सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार १६ मे २०२३ पर्यंत अधिकृत वेबसाइट shar.gov.in वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. (recruitment in ISRO 12th pass will get job in ISRO )

अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. यानंतर, उमेदवार नोंदणीकृत तपशिलांसह लॉग इन करून त्यांचा अर्ज सबमिट करू शकतील. अर्जादरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून ७५० ते ५०० रुपये शुल्क भरावे लागेल.

राखीव प्रवर्गातील उमेदवार तसेच सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी भरती अधिसूचना पाहा.

पात्रता

ड्राफ्ट्समन आणि तंत्रज्ञ पदांसाठी, उमेदवारांनी रिक्त पदांशी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय व उच्च माध्यमिक (१२वी) उत्तीर्ण केलेले असावे. तर, वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी, उमेदवार विज्ञान पदवीधर असणे आवश्यक आहे.

तांत्रिक सहाय्यक पदांसाठी, उमेदवारांनी रिक्त पदांशी संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. अर्जाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच १६ मे रोजी सर्व पदांसाठी उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: वय ९८... हाती काटा-चमचा, पुण्याच्या इंदू आज्जींचा शिष्टाचार तरुणांना लाजवणारा! हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

मैत्रीचा ‘जब्राट’ अनुभव लवकरच रुपेरी पडद्यावर; चित्रपटाचं दमदार पोस्टर प्रदर्शित

Leopard Attacks : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांवर बिबट्याने थेट झेप घेतली अन्..., पुढं घडलं भयानक

Crime News : पुरावा नसतानाही दहा वर्षांपूर्वीचा खून उघडकीस; नंदुरबार पोलिसांची कामगिरी

बाहुबलीतल्या शिवगामीला मराठी अभिनेत्रीने दिलाय आवाज; "तिचे दोन्ही काळ.."

SCROLL FOR NEXT