ITBP google
एज्युकेशन जॉब्स

Job Alert : ITBPमध्ये भरती; ८५ हजार रुपये मिळणार पगार

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा कामाच्या अनुभवासह समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

नमिता धुरी

मुंबई : ITBP ने तज्ञ डॉक्टरांच्या पदासाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळेल. (recruitment in ITBP job for graduates government job)

इंडो-तिबेट पोलीस दलाने भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ITBP मध्ये १० पदांवर भरती होणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइट itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

रिक्त जागांचा तपशील

ITBP मध्ये या भरती मोहिमेद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या १० पदांवर भरती केली जाईल.

पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा कामाच्या अनुभवासह समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

निवड प्रक्रिया

तज्ञ डॉक्टरांच्या पदासाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेत उपस्थित राहावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ८५ हजार रुपये पगार दिला जाईल. उमेदवारांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली जाईल.

मुलाखत कधी होईल

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना २४ ते २६ एप्रिल दरम्यान नियुक्त केलेल्या केंद्रांवर सकाळी ९ वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT