Sports Job  google
एज्युकेशन जॉब्स

Sports Job : नोकरी शोधणाऱ्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी ! SAIमध्ये भरती

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा पदवी असावी. तसेच त्यांनी ऑलिम्पिक किंवा संबंधित खेळांमध्ये भाग घेतलेला असावा.

नमिता धुरी

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) द्वारे विविध पदांची भरती केली जात आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. यानंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म SAI कडून स्वीकारला जाणार नाही. या भरतीद्वारे प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे. हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी... (recruitment in sports authority of india )

शैक्षणिक पात्रता

- अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा पदवी असावी. तसेच त्यांनी ऑलिम्पिक किंवा संबंधित खेळांमध्ये भाग घेतलेला असावा.

वय श्रेणी

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ ते ६० वर्षे असावे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार वयोमर्यादेशी संबंधित अधिक तपशील तपासू शकतात.

याप्रमाणे अर्ज करा

  • सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम sportsauthorityofindia.nic.in वर जावे.

  • मग भरती विभागावर क्लिक करावे.

  • येथे नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.

  • SAI 2023 फॉर्म भरा आणि सबमिट करा.

  • यानंतर, SAI फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT