'NIELIT' मध्ये वैज्ञानिक पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज Sakal
एज्युकेशन जॉब्स

'NIELIT' मध्ये वैज्ञानिक पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

'एनआयईएलआयटी'मध्ये वैज्ञानिक पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

संस्थेने 8 नोव्हेंबर 2021 रोजी जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार वैज्ञानिक C आणि Scientist D च्या एकूण 33 पदांची थेट भरती प्रक्रियेद्वारे निवड करायची आहे.

सोलापूर : इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (National Institute of Electronics and Information Technology - NIELIT) ने वैज्ञानिक (Scientist) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेने 8 नोव्हेंबर 2021 रोजी जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (No. NIELIT/NDL/MeitY/2021/2) वैज्ञानिक C आणि Scientist D च्या एकूण 33 पदांची थेट भरती प्रक्रियेद्वारे निवड करायची आहे. सायंटिस्ट सी च्या घोषित रिक्त पदांपैकी 28 अनारक्षित आहेत; तर 11 ओबीसी, 4 एससी, 3 एसटी आणि 2 ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. त्याचप्रमाणे, वैज्ञानिक डी च्या एकूण रिक्त पदांपैकी 4 अनारक्षित आहेत आणि 1 पद ओबीसी उमेदवारांसाठी राखीव आहे.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार NIELIT च्या अधिकृत वेबसाइट nielit.gov.in वर उपलब्ध केलेल्या फॉर्मद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. NIELIT सायंटिस्ट भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 7 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. तथापि, NIELIT ने प्रसिद्ध केलेल्या सायंटिस्ट रिक्रूटमेंट 2021 जाहिरातीनुसार, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज पेजवर दिलेले पात्रता तपशील आणि सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

NIELIT Scientist C, D भरती 2021 साठी अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना प्रथम अर्ज पेजवर नोंदणी करावी लागेल, ज्यासाठी उमेदवारांना त्यांचे तपशील भरावे लागतील. यानंतर, वाटप केलेल्या नोंदणी आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून उमेदवार संबंधित पदासाठी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील.

असा असेल पगार

वैज्ञानिक C पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर सातव्या वेतन आयोग वेतन मॅट्रिक्‍स स्तर - 11 (रु. 67,700 ते रु. 2,08,700) नुसार मासिक वेतन दिले जाईल. त्याचवेळी, वैज्ञानिक डी पदांसाठी, वेतन मॅट्रिक्‍स स्तर - 12 (रु. 78,800 ते रु. 2,09,700) नुसार दरमहा वेतन दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune News : हवेची गुणवत्ता वाढल्याने पुण्याचा देशात १० वा क्रमांक

Hingoli Accident : भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; बसची विद्युत खांबाला धडक

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

SCROLL FOR NEXT