REET Exam
REET Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

REET परीक्षा जुलैमध्ये; 62,000 पदांची होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

'आरईईटी परीक्षेदरम्यान ज्या सुविधा देण्यात आल्या होत्या, त्या पुन्हा दिल्या जाणार आहेत.'

Rajasthan Teacher Recruitment : राजस्थानमध्ये शिक्षकांच्या हजारो पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी REET परीक्षा जुलैमध्ये घेतली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केलीय. ते म्हणाले, REET परीक्षा जुलै 2022 मध्ये होणार आहे. त्यामुळं REET उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमीय. सरकारनं पदांचीही संख्या वाढवलीय, असंही त्यांनी नमूद केलं.

यापूर्वी REET परीक्षेद्वारे (REET Exam) 32,000 पदांची भरती केली जाणार होती. मात्र, ती आता 62,000 करण्यात आलीय. तसेच यापूर्वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही, असं गेहलोत यांनी सांगितलंय. आरईईटी परीक्षेदरम्यान ज्या सुविधा देण्यात आल्या होत्या, त्या पुन्हा दिल्या जातील. राज्य सरकारनं आरईईटी परीक्षेदरम्यान खासगी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली होती, यावेळीही ही सुविधा दिली जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अर्थसंकल्पात शिक्षण आणि रोजगारासाठी 'या' घोषणा करण्यात आल्या

1. सरकार येत्या काही दिवसांत 1 लाख नवीन पदांची भरती करणार आहे.

2. CISF च्या धर्तीवर RISF ची स्थापना केली जाईल. या स्थापनेनंतर 2000 सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल.

3. राज्यातील माध्यमिक शाळा वरिष्ठ माध्यमिक शाळांमध्ये श्रेणीसुधारित केल्या जातील.

4. शहरी आणि ग्रामीण भागात 1000-1000 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या जातील.

5. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचे स्वतंत्र संवर्ग तयार करून 10 हजार शिक्षकांची भरती केली जाईल.

6. 19 जिल्ह्यांमध्ये 36 महिला महाविद्यालये उघडली जातील.

7. 25 मुलींच्या महाविद्यालयात नवीन विषय सुरू केले जातील.

8. पुढील वर्षी अजमेर, जोधपूर आणि कोटा येथील नवीन वैद्यकीय संस्थांवर 250 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

9. पुढील वर्षी 18 जिल्ह्यांमध्ये नर्सिंग कॉलेज सुरू होतील.

10. कॉपी रोखण्यासाठी SOG मध्ये कॉपी विरोधी युनिटची निर्मिती केली जाईल.

11. JLN रोडवर असलेल्या शैक्षणिक संस्थांवर 400 कोटी रुपये खर्च केले जातील.

12. जयपूरच्या खेतान स्कूलमध्ये 100 कोटी रुपये खर्चून एक अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT