Samyukta Maharashtra movement  google
एज्युकेशन जॉब्स

Maharashtra Din : शाळकरी विद्यार्थ्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ भडकली

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना मोरारजी देसाई यांनी चळवळीत सहभागी झालेल्या लोकांवर गोळ्या झाडण्याचे निर्देश दिले होते.

नमिता धुरी

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही मागणी अनेक विचारवंतांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. त्यातच राजकीय नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे चळवळीच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. तळपायाची आग मस्तकात जावी अशी ती वक्तव्यं होती.

अशातच एक ठिणगी पडली आणि चळवळ चिघळली. त्यातच पुढे शेकडो आंदोलक हुतात्मा झाले. ती ठिणगी होती एका शाळकरी मुलाची. (sanyukta maharashtra chalwal Samyukta Maharashtra movement bandu gokhale died in police firing )

बंडू गोखले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुलाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. महाराष्ट्राचं भविष्य असं किड्या-मुंग्यांसारखं चिरडलं जात होतं. त्यामुळे चळवळ आणखीनच भडकली.

गजानन ऊर्फ बंडू गोखले हे मुंबईतील गिरगावात राहणारे रहिवासी होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना मोरारजी देसाई यांनी चळवळीत सहभागी झालेल्या लोकांवर गोळ्या झाडण्याचे निर्देश दिले होते.

१६ जानेवारी १९५६ रोजी बंडू गोखले हे त्यांच्या वसतिगृहातून बाहेर पडले होते. त्याच वेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते रात्रशाळेचे विद्यार्थी होते.

बंडू यांच्या मृत्यूमुळे आंदोलक रस्त्यावर उतरले. शाळा, महाविद्यालये, बँका, कार्यालये, इत्यादी ठिकाणी संप करण्यात आला. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली होती. तरीही आंदोलक रस्त्यावर उतरल्याने पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव आणि निपाणी येथे ७ जणांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले.

मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त होती. त्यामुळे ती महाराष्ट्रातच जाईल अशी शक्यता होती. तसेच मुंबईच्या आसपासचा प्रदेश हा मराठी भाषिक होता जो महाराष्ट्रात सामील होणार होता. त्यामुळे मुंबईवरील महाराष्ट्राच्या दाव्याला बळ मिळाले. मात्र गुजरातींनीही येथील विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुतवणूक केली होती.

१५ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. त्यानंतर आंदोलक लगेच रस्त्यावर आले. रात्रशाळेतील विद्यार्थी बंडू गोखले पोलिसांच्या गोळीला बळी पडले. आंदोलनाचे नेते कॉम्रेड एस. ए. डांगे आणि सेनापती बापट यांना अटक करण्यात आली.

१६ जानेवारी १९५६ ते २२ जानेवारी १९५६ या काळात युनियनच्या नेत्यांनी बॉम्बे बंदची हाक दिली. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी पुन्हा एकदा आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले ज्यात ९० लोक मरण पावले आणि ४०० हून अधिक जखमी झाले.

आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या प्रस्तावावरून राजीनामा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT