Satara Latest Marathi News 
एज्युकेशन जॉब्स

एनबीसीसीच्या दिल्ली कार्यालयात सहाय्यक पदांसाठी मोठी भरती; SC, ST, OBC आणि दिव्यांगांना असणार विशेष प्राधान्य

सकाळवृत्तसेवा

सातारा : NBCC Recruitment 2021 : केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयांतर्गत एनबीसी (इंडिया) लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम सुरू केली आहे. भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एका एनबीसीने विविध रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ऑफिस असिस्टंट (स्टेनोग्राफर), सीनियर स्टेनोग्राफर, असिस्टंट मॅनेजर, सीनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह, डिप्टी प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल), प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल), डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) आणि अप्पर जनरल मॅनेजर (फायनान्स) अशी एकूण कंपनीची पदे आहेत, यासाठी 12 रिक्त जागांकरीता आपल्याला अर्ज करता येईल.

कसा करावा अर्ज?

एनबीसीसी विशेष भरती अभियानाअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी एनबीसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर nbccindia.com भेट द्यावी व त्यानंतर येथे दिलेल्या संबंधित भरती जाहिरातींसह ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करुन आपण ऑनलाईन अर्ज भरु शकता. दरम्यान, अर्ज भरत असताना उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर उमेदवाराने संकेतस्थळावर आपला लॉगिन आयडी प्रविष्ट करुन तिथे देण्यात आलेली माहिती समजून घ्यावी आणि आपला अर्ज प्रविष्ट करावा. अर्ज भरत असताना उमेदवाराला कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.

अशी होईल निवड 

ऑफिस असिस्टंट (स्टेनोग्राफर) आणि ज्येष्ठ स्टेनोग्राफर या पदांच्या उमेदवारांची कौशल्य चाचणीच्या आधारे एनबीसीसीने जाहीर केलेल्या पदांमधून निवड केली जाईल. उर्वरित इतर पदांच्या उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ज्यात कौशल्य चाचणी किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवारांची त्यांच्या अर्जाच्या तपशीलांच्या आधारे निवड होईल, असेही स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT