Savitribai Phule sakal
एज्युकेशन जॉब्स

Savitribai Phule : फक्त शिक्षणच दिलं नाही तर, सावित्रीबाईंनी ही कामंही केली

सावित्रीबाईंचे हे कार्य आपणा सर्वांना माहीतच असते. पण याही पलीकडे जाऊन त्यांनी समाजसुधारणेसाठी बरीच कामे केली.

नमिता धुरी

मुंबई : भारतात स्त्री शिक्षणाची सुरूवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात ३ जानेवारी १८३१ रोजी दलित कुटुंबात झाला.

ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याचीही मोकळीक नव्हती त्या काळात सावित्रीबाई यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना वाचन-लेखन शिकवले. त्यानंतर सावित्रीबाईंनी इतर स्त्रियांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका ठरल्या. हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सावित्रीबाईंना स्वत:च्या आणि इतर महिलांच्या शिक्षणासाठी सामाजिक विरोध पत्करून कठोर संघर्ष करावा लागला. त्यांनी पुणे आणि अहमदनगर येथे शिक्षक प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंचे हे कार्य आपणा सर्वांना माहीतच असते. पण याही पलीकडे जाऊन त्यांनी समाजसुधारणेसाठी बरीच कामे केली.

सावित्रीबाईंचे कार्य

१. फुले दाम्पत्याने देशात एकूण १८ शाळा सुरू केल्या. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीनेही त्यांच्या या कार्याचा सन्मान केला होता.

२. त्यांनी आपल्या अंगणातील विहीर दलितांसाठी खुली केली.

३. सावित्रीबाईंनी विधवा, बालविधवा, परित्यक्ता, निराधार महिलांसाठी आश्रम सुरू केला व तेथील महिलांनाही त्या शिकवत.

४. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या सत्यशोधक समाजाचे काम सावित्रीबाईंनी हाती घेतले व समाजालाही प्रेरित केले. पतीचे अंत्यसंस्कारही सावित्रीबाईंनीच केले होते.

५. जातीभेद व पुरूषत्ताक संस्कृतीविषयी भाष्य करणाऱ्या कविता सावित्रीबाईंनी केल्या. त्यांची ४ पुस्तके प्रकाशित झाली होती.

६. पुण्यात प्लेगची साथ सुरू झाल्यानंतर त्यांनी रुग्णांची सेवा केली. यादरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली व १८९७ साली मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT