NDA topper 2021 google
एज्युकेशन जॉब्स

एनडीएच्या पहिल्या महिला तुकडीत शानन ढाका सर्वोच्च स्थानी

शाननने एनडीएच्या महिला बॅचमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. गेल्या वर्षी, सर्वोच्च न्यायालयाने एनडीए परीक्षेत महिलांच्या सहभागी करून घेण्याचे आदेश दिले होते.

नमिता धुरी

मुंबई : शानन ढाकाने एनडीएच्या पहिल्या महिला तुकडीमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले आहे. संपूर्ण तुकडीमध्ये तिचे स्थान दहावे असून महिलांमध्ये ती प्रथम आली आहे. एनडीएच्या परीक्षेत महिलांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शाननने एनडीएच्या महिला बॅचमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. गेल्या वर्षी, सर्वोच्च न्यायालयाने एनडीए परीक्षेत महिलांच्या सहभागी करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

नागरी सेवा किंवा संरक्षण सेवेत रुजू होण्याचे स्वप्न

१९ वर्षीय शानन मूळची हरियाणाची आहे. तिने आर्मी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले असून सध्या दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून बीए करत आहे. ती म्हणते की ती तिला एकतर नागरी सेवा परीक्षा द्यायची होती किंवा संरक्षण दलाची परीक्षा द्यायची होती. एनडीएची अधिसूचना आल्यावर तिने लगेच अर्ज केला.

शालेय जीवनापासूनच गुणवंत

शानन शालेय जीवनापासूनच एक गुणवंत विद्यार्थिनी आहे. तिला दहावीच्या परीक्षेत ९७.४ टक्के आणि बारावीच्या परीक्षेत ९८.२ टक्के गुण मिळाले होते. तयारीबाबत शानन म्हणते की, तिच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असल्याने जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. यासोबतच तिने व्यक्तिमत्त्व चाचणीचीही तयारी सुरू केली आहे.

वडील आणि आजोबांकडून सैन्यात भरती होण्याची प्रेरणा

सैन्यात भरती होणे ही देशाची सेवा आहे, असे शाननचे मत आहे. शाननला तिचे आजोबा सुभेदार चंद्रभान ढाका आणि वडील नायक सुभेदार विजयकुमार ढाका यांच्याकडून सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT