police esakal
एज्युकेशन जॉब्स

सोलापूर: चालक पोलिस शिपाई पदासाठी 1 ऑक्‍टोबरला परीक्षा

तात्या लांडगे

शहरातील पाच परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली असून सकाळी दहा वाजता ही परीक्षा सुरु होणार आहे.

सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या आस्थापनेवरील चालक पोलिस शिपाई पदाच्या रिक्‍त 41 जागांसाठी 1 ऑक्‍टोबरला परीक्षा होणार आहे. त्यासाठी शहरातील पाच परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली असून सकाळी दहा वाजता ही परीक्षा सुरु होणार आहे.

चालक पोलिस शिपाई पदाच्या 41 जागांसाठी जिल्ह्यातील चार हजार 612 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांची ऑफलाइन परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेला येताना उमेदवारांनी प्रवेश पत्राबरोबरच सेल्फ डिक्‍लेरेशन फॉर्म व कोरी चार पाने घेऊन यावीत, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. दुसरीकडे काळा अथवा निळा बॉलपेन, दोन पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट) सोबत आणावा, असेही सांगण्यात आले आहे. तर मोबाइल, स्मार्ट वॉच, घड्याळ, ईलेक्‍ट्रिक उपकरणे, कॅलक्‍युलेटर व ब्लू टुथ सोबत नसावे, अशाही सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी दहा वाजता परीक्षा सुरु होणार असल्याने उमेदवारांना सकाळी आठ ते साडेनऊ यावेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. त्यानंतर येणाऱ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असेही ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

ठळक बाबी...

- चालक पोलिस शिपाई पदासाठी 1 ऑक्‍टोबरला परीक्षा

- शहरातील पाच केंद्रांवर होणार परीक्षा

- जिल्ह्यातील 41 पदांसाठी चार हजार 612 उमेदवारांनी केले अर्ज

- htttp://mahapolicerc.mahaitexam.in/phasone यावरुन काढता येईल प्रवेश पत्र

- उमेदवारांनी परीक्षेसाठी आठ ते साडेनऊ यावेळेत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे बंधन

सोलापूर जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्रे

सोलापूर शहर-ग्रामीणमधील पाच केंद्रांवर चालक पोलिस शिपाई पदासाठी परीक्षा होणार आहे. त्यामध्ये कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर, एचएन कॉलेज ऑफ कॉमर्स, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस ऍन्उ सायन्स, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव आणि सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव या केंद्रांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT