jOBS
jOBS Gallery
एज्युकेशन जॉब्स

पदवीधर युवकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या संपूर्ण तपशील

श्रीनिवास दुध्याल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) पदवीधर तरुणांसाठी, संगणक ज्ञान असलेल्या उमेदवारांसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.

सोलापूर : जर तुम्ही सरकारी नोकरीची (Government Jobs) तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) (NTA) पदवीधर व संगणक ज्ञान असलेल्या उमेदवारांसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत न्यायालयाने रिव्ह्यू ऑफिसर (Review officer), असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर (assistant Review officer) आणि कॉम्प्युटर असिस्टंट (Computer assistant) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 411 पदांची भरती केली जाईल. यामध्ये 46 आरओ, 350 एआरओ आणि संगणक सहाय्यकाच्या 15 पदांची भरती केली जाईल.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते https://recruitment.nta.nic.in/WebInfoAllahbadHC/Page या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की रिव्ह्यू ऑफिसर आणि असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर या दोन्ही पदांसाठी उमेदवार एक सामान्य अर्ज करू शकतात आणि प्रत्येक पदासाठी आवश्‍यक शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागेल. तथापि, संगणक सहाय्यक पदासाठी उमेदवार स्वतंत्र अर्ज करू शकतात आणि त्यासाठी आवश्‍यक शुल्क भरावे लागेल.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असले पाहिजे. तसेच 1 जुलै 2021 रोजी सर्व संगणक सहाय्यक पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. याशिवाय इतर पदांसाठी 21-35 वर्षे ही वयोमर्यादा आहे. यासोबतच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट देण्यात येईल. या पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सीबीटी मोडमध्ये असेल परीक्षा

NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी उमेदवारांची निवड वस्तुनिष्ठ प्रकारे चाचणी आणि संगणक ज्ञान चाचणी (CBT ॅड्यूल)च्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण यासंबंधीची माहिती उमेदवारांना केवळ ऑनलाइन प्रवेशपत्राद्वारे दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: सगळी स्वप्ने पूर्ण होतील.. पंतप्रधान मोदींची शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर!

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर खून प्रकरणी कोर्टाने सुनावले पोलिसांना खडे बोल! तावडे, पुनाळेकर, भावे का ठरले निर्दोष?

Impact Player: रोहित शर्मासह अनेकांनी टीका केलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम IPL मधून होणार बाद? जय शाह म्हणाले...

Latest Marathi News Live Update : 'सरकारी इफ्तारीचं आयोजन करणारे श्रीराम मंदिराला अँटी-नॅशनल म्हणतायत..'; मोदींची नंदुरबारमध्ये टीका

PM Modi: 'इथले आदिवासी हे आफ्रिकन आहेत का?', पंतप्रधान मोदींचा नंदुरबारमध्ये सवाल; काँग्रेसवर केली टीका

SCROLL FOR NEXT