Indian Army Canva
एज्युकेशन जॉब्स

इंडियन आर्मीमध्ये नोकरीची संधी! महिला उमेदवारही करू शकतात अर्ज

इंडियन आर्मीमध्ये नोकरीची संधी असून महिला उमेदवारही करू शकतात अर्ज

श्रीनिवास दुध्याल

अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार Indian Army JAG 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सोलापूर : भारतीय सेना (Indian Army) ने JAG Entry Scheme 27th Course (Oct 2021) लघू सेवा एन्ट्री (NT) अभ्यासक्रमासाठी एक अधिसूचना प्रकाशित केली आहे. अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार Indian Army JAG 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 4 जून 2021 पर्यंत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. (There are job opportunities in the Indian Army and women candidates can also apply)

JAG 2021 कोर्ससाठी अर्ज करणे आवश्‍यक आहे. उमेदवार लॉमध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री प्राप्त केलेला असावा. भारतीय सैन्याने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार रिक्त पदांची एकूण संख्या 8 आहे. त्यातील 6 पदे पुरुषांसाठी तर 2 पदे महिलांसाठी आहेत. पदांची व इतर माहितीसाठी उमेदवार ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकतात.

वेतनमान

  • लेफ्टनेंट - लेव्हल 10 : 56,100 - 1,77,500 रु.

  • कॅप्टन - स्तर 10 बी : 61,300 - 1,93,900 रु.

  • मेजर - लेव्हल 11 : 69,400 - 2,07,200 रु.

  • लेफ्टनेंट कर्नल - लेव्हल 12 ए : 1,21,200 - 2,12,400 रु.

  • कर्नल - लेव्हल 13 : 1,30,600 - 2,15,900 रु.

  • ब्रिगेडियर- लेव्हल 13 ए - 1,39,600 - 2,17,600 रु.

  • मेजर जनरल लेव्हल 14 : 1,44,200 - 2,18,200 रु.

  • सैन्य सेवा वेतन (एमएसपी) - लेफ्टनेंट्‌सपासून ब्रिगेडियरपर्यंतचे एमएसपी 15,500 रु.

सेवा शैक्षणिक प्रशिक्षण कालावधीत पुरुष किंवा महिला कॅडेटर्स यांना ओटीए मध्ये 56,100 रुपये दरमहा मिळतील. अधिक माहितीसाठी ऑफिशियल नोटिफिकेशन पाहा.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता प्राप्त कॉलेज / विद्यापीठातून एलएलबी डिग्रीमध्ये किमान 55 टक्के गुण (पदवीनंतर तीन वर्षे व्यावसायिक किंवा दहा + दोन परीक्षेनंतर पाच वर्षे) असणे आवश्‍यक आहे. बार कॉन्सिल ऑफ इंडिया / स्टेटमध्ये वकील म्हणून नोंदणी करण्यासाठी उमेदवार पात्र असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : काश्मीरहून दिल्लीला ३६ टन सफरचंद पाठवले जाणार

Manchar News : स्मार्ट मीटरमुळे गरीब शेतमजुरांवर लाखोंचे वीजबिल, आंबेगावात कुटुंब अंधारात

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

SCROLL FOR NEXT