UPSC_CDS(1) 
एज्युकेशन जॉब्स

UPSC CDS(I) 2021: कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; लगेच करा डाउनलोड

सकाळ डिजिटल टीम

UPSC CDS-1 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस-१ परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र (Admit Card) प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून ते डाउनलोड करता येईल. ही परीक्षा पुढील महिन्यात म्हणजे ७ फेब्रुवारीला देशातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

345 पदांसाठी होणार भरती
या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात एकूण ३४५ अधिकारी पदांची भरती करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सीडीएस-१ परीक्षा २०२१ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २८ ऑक्टोबर रोजी सुरू केली होती. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती.

रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे - 
इंडियन मिलिट्री अॅकेडमी (IMA) डेहराडून - १००
इंडियन नेवल अॅकेडमी (INA) एझिमला - २६
इंडियन एअर फोर्स अॅकेडमी (IAFA) हैदराबाद - ३२
ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी (OTA) चेन्नई (पुरुष) - १७०
 ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी (OTA) चेन्नई (महिला) - १७

परीक्षेसाठी पॅटर्न
यूपीएससी सीडीएसची लेखी परीक्षा ३०० गुणांची असून त्यामध्ये इंग्रजी, जनरल नॉलेज आणि गणितावर आधारित १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाना एक गुण असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण कापले जाणार आहेत. ज्यांनी ओटीएसाठी अर्ज केला आहे, त्यांना फक्त इंग्रजी आणि जनरल नॉलेज पेपर द्यावा लागणार आहे.

प्रवेशपत्र (Admit Card) असं करा डाऊनलोड :
- सुरवातीला अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी upsconline.nic.in/ eadmitcard या अधिकृत वेबसाइटवर जावे.
- त्यानंतर होमपेजवर डाउनलोड अॅडमिट कार्ड या लिंकवर क्लिक करावे.
- त्यानंतर नोंदणी क्रमांक/ रोल नंबर ही माहिती भरावी.
- क्लिक करताच UPSC CDS-1 अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
- अॅडमिट कार्ड डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.

- UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा 
- अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे ►
 क्लिक करा 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशावर बीएनपीच्या निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख नझरुल इस्लाम खान यांची प्रतिक्रिया

Jalna News : सरकारी डेटावर डल्ला! आधार, पॅन, गॅस कार्ड, वाहन डिटेल्ससह ई-चालनाची माहिती लिंक; सहा हजार बनावट वेबसाईट सक्रिय

Kolhapur Lake : जुन्या शहराभोवती, व्यवस्था शेतीसाठी; शेतीला पाणी देण्याची पद्धती अनेक शतकाच्या आधीपासूनच अस्तित्वात

Chhatrapati Sambhajinagar News : शिरसाटांचा इगो काही जाईना, म्हणे ‘जंजाळ मुख्यमंत्री होवो’!

SCROLL FOR NEXT