UPSC
UPSC 
एज्युकेशन जॉब्स

UPSC 2021: पूर्वपरीक्षेसंदर्भात आली महत्त्वाची अपडेट

सकाळ डिजिटल टीम

UPSC Prelims 2021: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने या वर्षी घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून इच्छुक उमेदवार यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार असून त्यासाठी तुम्हाला यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च आहे. 

असा करा अर्ज -
- सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर नागरी सेवा परीक्षा २०२१ वर क्लिक करा. 
- त्यानंतर भाग १ म्हणजे नोंदणीसाठीचे रकाने भरा आणि फॉर्म भरल्यानंतर शेवटी फी भरा.
- शेवटी परीक्षा केंद्र आणि तुमचे छायाचित्र (आय-कार्ड साइज फोटो) अपलोड करा. 

आवश्यक पात्रता -
या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

कधी होणार पूर्व परीक्षा -
यूपीएससीची पूर्व परीक्षा २७ जून २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केलं आहे.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT