want know admission process after JEE
want know admission process after JEE 
एज्युकेशन जॉब्स

विद्यार्थ्यांनो, 'अशी' असते जेईई नंतरची प्रवेश प्रक्रिया...

- रीना भुतडा (करिअर समुपदेशक)

'जेईई' परीक्षा देण्याचे दोन मुख्य उद्देश असतात.  एक म्हणजे आपल्याला आयआयटीला जायचे असते. ते पण जेईई एडव्हान्स क्रॅक केल्यानंतर आणि दुसरे म्हणजे चांगल्या एनआयटी किंवा ट्रिपल आयटीमध्ये जेईई मेन्सच्या माध्यमातून प्रवेश मिळविणे. जानेवारी 2020 मध्ये 9.21 लाख  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर जून 2020साठी (लॉकडाऊन पूर्वीची एप्रिल) जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. दोन्ही परीक्षांपैकी जास्त असणारे गुण/पर्सेंटाइल ग्राह्य धरण्यात येतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयआयटी, एनआयटी किंवा ट्रिपल आयटीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 'जेईई मेन' ही द्यावीच लागते. कोणते विद्यार्थी आयआयटी, एनआयटी व ट्रिपल आयटी ला प्रवेश घेतात, कॉलेज व ब्रँचची (शाखा) निवड कशी करतात आणि किती स्कोअर लागतो, तसेच जेईई-मेनच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या संधी असतात, त्याविषयी सविस्तर पाहू.

आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

जेईई ऍडव्हान्समध्ये पात्र होण्यासाठी जेईई-मेनमध्ये पुढील प्रवर्गवार किमान गुण/पर्सेंटाइल (कट ऑफ) मिळवावे लागतात. जेईई मेन्समधून ॲडव्हान्सकरिता किमान कट ऑफ गुण मिळवणाऱ्या जवळपास सव्वादोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  जनरल- 90, ओबीसी 72, एससी-49, एसटी 43 च्या जवळपास कट ऑफ दरवर्षी असतो. याचाच अर्थ जेईई ॲडव्हान्सला जाण्यासाठी जेईई मेनमध्ये तुम्हाला एवढे कमीत कमी गुण तुमच्या प्रवर्गानुसार मिळवावे लागतील. नंतर तुम्ही जेईई अॅडव्हान्समध्ये चांगले गुण मिळवून आयआयटीमधील प्रवेश प्रक्रियेच्या कौन्सेलिंग राऊंडसाठी जाऊ शकणार. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याने आपल्या रँकवर परिणाम  होऊ शकतो, अशा दरवर्षी तीन-चार बाबी असतात.  त्यातील पहिली म्हणजे  जेईई-मेन परीक्षेची दरवर्षीची असणारी कमी किंवा जास्त काठिण्यपातळी असते. सामान्य तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा थोडी कठीण वाटू शकते.
 
सावधान ! पुण्यातील `या` भागात तुमच्या सोबतही असा भयानक प्रकार घडू शकतो

दुसरा मुद्दा म्हणजे किती विद्यार्थी ही परीक्षा देतात, हे पण तुमच्या रँकला परिणाम करू शकते. कारण जितके जास्त विद्यार्थी तितकी स्पर्धा जास्त. तिसरा मुद्दा म्हणजे तुम्ही किती जास्तीत जास्त मार्क्स/रँक  मिळविण्याचे ध्येय ठेवताय. कुठली रँक चांगली किंवा वाईट नसते, तर ती तुमच्या अभ्यासाची तयारी किती, तुम्ही टार्गेट किती व कसे निश्चित करीत आहात, त्यावर अवलंबून असते. शेवटचा मुद्दा म्हणजे कुठली एनआयटी, ट्रिपल आयटी मिळेल, कुठली ब्रँच मिळेल. चांगल्या एनआयटीला जायचे असेल, तर कुठला चांगला स्कोअर मिळवावा लागेल, ब्रँच हवी ती मिळेल किंवा नाही, म्हणजे नंतर मला चांगला जॉब किंवा पॅकेज मिळन्याच्या संधी जास्त असतील.

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

पूर्वी जेईई  मेन परीक्षा ही 360 गुणांची असायची, आता 2019 पासून जेईई मेन परीक्षा 300 गुणांची आहे.  कुठली एनआयटी, ट्रिपल आयटी कुठल्या स्कोअरवर मिळते, ती रेंज काय असते, ते पाहू. तुमचा स्कोर 120 ते 135 च्या दरम्यान असेल, तर कोणती ना कोणती एनआयटी मिळण्याची शक्यता असतेच. भारतामध्ये एकूण 31 एनआयटी आहे. तुम्हाला वीस ते पंचवीसमधील एनआयटी मिळण्याची शक्यता असते. पण येथे तुम्हाला हवी ती शाखा मिळेलच असे नाही. तिथे तडजोड करायला लागू शकते. शिवाय यादीच्या तळातील एनआयटीमधील चांगल्या शाखा मिळण्याची शक्यता असते. जर तुमचा स्कोअर 140 ते 160 असेल, तर तो स्कोअर म्हणजे पन्नास टक्क्यांच्या आसपास असतो. (140-160 /300) म्हणजे रँक 14,000 ते 15,000च्या दरम्यान  असते.  टॉप 10 एनआयटी मिळण्याची शक्यता असते, पण ब्रँचमध्ये कॉम्प्रमाईज करण्याची वेळ येऊ शकते. आपला स्कोअर 160 ते 180 म्हणजे जवळपास 60 टक्‍क्‍यांच्या आसपास असेल, तर टॉपच्या दहा एनआयटी विद्यार्थी मिळवू शकतात. पण टॉप तीन एनआयटीमध्ये चांगली ब्रँच मिळवण्यासाठी तडजोड  करावी लागू शकते. टॉप समजल्या जाणाऱ्या तीन एनआयटी कुठल्या, तर त्रिची, वारंगल व सुरथखल. आपला स्कोर 180 च्या वर असेल, तर आपण जेईई एडव्हान्सचा चांगल्यात चांगला स्कोअर मिळवण्याचा प्रयत्न करावा. याच विद्यार्थ्यांचा मेन्स मधील रँक 5,000 च्या आत असतो. 5,000च्या आत रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना टॉप तीन एनआयटीमध्ये प्रवेश मिळविण्याची चांगली संधी असते. साधारणतः 10,000 ते अगदी 30,000 रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रिपल आयटी ला प्रवेश मिळू शकतो. 

पुणेकरांनो, तळजाईवर फिरायला जायचयं? मग 'ही' बातमी वाचा

आयसीटी मुंबई येथील तीस टक्के जागा जेईई मेन्सच्या  माध्यमातून भरण्यात येतात. महाराष्ट्रातील अनेक खाजगी  अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पंधरा टक्के जागा जेईई मेन्ससाठी राखीव असतात. अनेक अभिमत तसेच खाजगी विद्यापीठे जेईई मेन्सच्या आधारे प्रवेश देतात.  येणाऱ्या जून 2020 जेईई मेन्स परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळविल्यास चांगल्या संस्थेत  प्रवेश मिळविणे शक्य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT